शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र अन् राज्य घरकुलात विभागात सातारा अव्वल, पुण्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते सन्मान 

By नितीन काळेल | Updated: March 2, 2024 13:28 IST

जिल्ह्याला २८ पैकी तब्बल १६ पुरस्कार प्राप्त

सातारा : अमृत महाआवास अभियान ग्रामीणमध्ये विभागस्तरावर केंद्राच्या प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत अव्वल स्थान मिळवत सातारा जिल्ह्याने २८ पैकी तब्बल १६ पुरस्कार मिळवले आहेत. याबद्दल पुण्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामुळे जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे.केंद्र तसेच राज्य शासनातर्फे पक्का निवारा नसणाऱ्या विविध समूहातील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. ही घरकुल योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. त्यासाठी पुरस्कारही दिला जातो. तर अमृत महाआवास अभियान ग्रामीण २०२२-२३ सुरू करण्यात आले आहे. याचा विभागस्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पुणे विभागात सातारा जिल्ह्याने सर्वच पातळीवर यशाचा डंका वाजवला आहे.

सर्वोत्कृष्ट जिल्हे या प्रकारात प्रधानमंत्री आवास ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत योजनेत सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर सर्वोत्कृष्ट तालुके प्रकारात प्रधानमंत्री योजनेत जावळी, कऱ्हाड आणि सातारा तालुक्यांनी अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त केले. तसेच राज्य योजनेत महाबळेश्वर तालुक्याने प्रथम तर माणला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींसाठीही पुरस्कार होते. यामध्ये प्रधानमंत्री योजनेत कऱ्हाड तालुक्यातील येळगाव आणि पाटणमधील भुडकेवाडीने प्रथम तर पाटण तालुक्यातीलच काठी ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळवला. राज्य योजनेत पाटणमधील बोंद्री ग्रामपंचायत प्रथम क्रमांकावर राहिली आहे.शासकीय जागा उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत तीनही तालुके सातारा जिल्ह्यातील आहेत. कोरेगाव, सातारा आणि कऱ्हाड तालुक्यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवला. तर वाळू उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरीत प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत योजनेतही पाटण तालुका प्रथम राहिला आहे.

या यशाचा गाैरव सोहळा पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झाला. आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुंडलवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांच्यासह विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच सरंपच उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPuneपुणे