आईच्या स्मरणार्थ दिली रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:25 AM2021-06-22T04:25:33+5:302021-06-22T04:25:33+5:30

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजसारख्या शहरात वैद्यकीय व्यवसाय करताना डॉ. संतोष मोरे यांनी रुग्ण सेवाभाव जपला आहे. ...

Ambulance given in memory of mother | आईच्या स्मरणार्थ दिली रुग्णवाहिका

आईच्या स्मरणार्थ दिली रुग्णवाहिका

Next

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजसारख्या शहरात वैद्यकीय व्यवसाय करताना डॉ. संतोष मोरे यांनी रुग्ण सेवाभाव जपला आहे. हा सेवाभाव जपतानाच त्यांनी सदिच्छा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून आई सुरेखा मोरे यांच्या स्मरणार्थ तालुक्याच्या आरोग्यसेवेला हातभार लावण्यासाठी नुकतेच रूग्णवाहिकेचे लोकार्पण केले आहे.

खटाव तालुक्यात सेवावृत्तीने काम करणाऱ्या डॉ. संतोष मोरे यांच्या सदिच्छा सोशल फाऊंडेशनच्यावतीने रूग्णसेवा करण्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. डॉ. मोरे यांनी कोरोना महामारीच्या काळात शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून केलेले कार्य निश्चित इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना काळातील बाधित रुग्णांची सेवा त्यांनी केली.

दरम्यान, डॉ. संतोष मोरे यांनी रुग्णांची ससेहोलपट थांबविण्यासाठी आपल्या आईच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले आहे. कोरोना काळात ही रुग्णवाहिका रुग्णसेवेत मोलाची भूमिका बजावणार आहे. डॉ. मोरे यांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Ambulance given in memory of mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.