शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आंबेडकर शाळा प्रवेश दिवस होणार राज्यभर विद्यार्थी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:56 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुलच आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर  विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा आदेश राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या वतीने काढण्यात आले परिपत्रक ७ नोव्हेंबरला राज्यभरात दिवस होणार साजराशाळेच्या नोंदवहीत आजही बाल भिवाची स्वाक्षरी

सातारा , दि. २८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुलच आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा आदेश राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे.

येथील राजवाडा परिसरात असलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या नोंदवहीत १९१४ या क्रमांकासमोर आजही बाल भिवाची स्वाक्षरी आहे.

हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे. डॉ. आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुल म्हटली पाहिजे. त्यांनी शाळेत पाऊल ठेवल्यामुळेच ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि कोट्यवधी दलित व वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. ते शाळेत गेल्यामुळे ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो, त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.

परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये रुजली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलवायला लावणारी क्रांतिकारी घटना ठरते. डॉ. आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा व्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला.

आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

विद्यार्थी दिवस उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

शासन निर्णयानुसार यंदा पहिल्यांदाच ७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेत घेण्यासाठी शिक्षकांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर याविषयी विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती देण्यात येईल.

- पुनिता गुरव,शिक्षणाधिकारी, सातारा

राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कूल

साताऱ्यात नगरपालिकेच्या स्थापनेनंतर १ आॅगस्ट १८५३ नंतर पालिकेचे १८८४ मध्ये सिटी म्युनिसिपालिटीमध्ये रुपांतर झाले. त्यावेळी मुलांच्या मराठी शाळा ८, हिंदुस्थानी मिश्र शाळा १, रात्रीची शाळा १ व मुलींकरीता १अशा ११ शाळा होत्या.

रात्रीची शाळा मजूर आणि कारागीर लोकांच्या मुलांकरीता होती. पालिकेकडे शिक्षण मंडळ येण्यापूर्वी १८६६ मध्ये  साताऱ्यामध्ये ४ प्राथमिक  शाळा होत्या. त्यामध्ये ५३८ विद्यार्थी होते. १८८३ पर्यंत १0 सरकारी शाळा होत्या. त्यामध्ये १ इंग्रजी शाळा, ७ मराठी मुलांच्या शाळा आणि एक मुलींची शाळा अशी स्थिती होती. 

इंग्रजी शाळा प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत सुरु झाली. या शाळेचे मुख्याध्यापक बाळशास्त्री भागवत होते. ही शाळा पूर्वी रंगमहालात होती. १८७१ मध्ये शाळेचे हायस्कुलमध्ये रुपांतर झाले. 

१८७४ साली ही शाळा गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणून सध्याच्या प्रतापसिंह हायस्कुलमध्ये (जुना राजवाडा) या ठिकाणी सुरु झाली. याच वास्तुमध्ये पालिकेच्या शाळा क्र. १ आणि शाळा क्र. १३ या शाळाही पाचवी ते सातवी आणि पहिली ते चौथी असे शिक्षण देत होत्या. त्यानंतर साताऱ्यात वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या नव्या नव्या शाळा उभ्या राहिल्या.

टॅग्स :SchoolशाळाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार