शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या भिंतींना पारंपरिक पद्धतीने झडपी बांधण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:42 IST

पेट्री : कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत पारंपरिक पद्धतीने घरांच्या भिंतींच्या संरक्षणासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. ...

पेट्री : कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत पारंपरिक पद्धतीने घरांच्या भिंतींच्या संरक्षणासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाळ्यात अतिपर्जन्यवृष्टी, दाट धुके, अति थंडीमुळे घरातील उबदार वातावरणासाठी जुन्या, पारंपरिक पद्धतीने कोळंब गवताच्या झडपा बांधून पर्यावरणपूरक उपाययोजना सुरू आहे.

डोंगरमाथ्यावरील अतिपर्जन्यवृष्टीमुळे शेतीकामास बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगड्यांच्या तुडुसाचा वापर करतात. मुसळधार पावसासह वाऱ्याचा जोर जास्त असल्याने छत्री, रेनकोटचा वापर अल्प आहे. गवताच्या झडपी बांधून घराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करतात. घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी जुन्या, पारंपरिक कोळंब गवताच्या झडपी बांधल्या जातात. सद्य:स्थितीत बहुतांश जणांनी झडपा बांधून घरांच्या भिंतींना संरक्षणात्मक उपाययोजना केली असून, काही ठिकाणी झडपा बांधण्याचे काम सुरू आहे.

मुसळधार पावसाचा तडाखा ज्या दिशेने बसतो. अशा बाजूच्या घरांच्या भिंतींना कोळंब गवताची झडपी बांधली जातात. मे अखेरीस अथवा जूनच्या सुरुवातीस कामाला सुरुवात होते. भिंतीपासून काही अंतरावर दोन्ही बाजूला लाकडं उभारून मेसाची फोकाटी आडवी, उभी, आत-बाहेर वेलीने बांधून मध्यभागी कोळंब गवत अशा विशिष्ट पद्धतीने ही झडपी बांधली जातात. पूर्वी छपरासाठी कौले न वापरता गवताची झडपी छप्पर म्हणून वापरायचे. सध्या बऱ्याच ठिकाणी कौलांचे छप्पर असून केवळ घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी गवताची झडपी बांधतात. पावसाळ्यानंतर कुजलेले गवत तरव्याला वापरून खतासाठी वापरतात.

चौकट

ओलीपासून सुटका

पावसाच्या तडाख्यात भिंतीवरील पाणी या झडपीमुळे जमिनीपर्यंत येते. भिंती भिजून घरामध्ये ओल येण्याचा धोका असतो. भिंती भिजून ओल निर्माण होऊ नये तसेच थंडीच्या सुरक्षिततेसाठी कोळंब गवताची झडपी आवश्यकतेनुसार घरांच्या भिंतींना बांधतात. याकामी शेतकरी कोळंब गवत राखून ठेवतात.

कोट

पाऊस सुरू होण्याअगोदर घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी झडपी बांधतात. पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तरी भिंतींना लागत नाही. त्यामुळे भिंती कोरड्या, घरातील वातावरण उबदार राहते. सहसा या भागात प्लास्टीक कागद वापरला जात नाही. कारण त्याला खर्चही आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कागद फाटू शकतो. त्यामुळे शेतकरी गवताचीच झडपी बांधतात. याला खर्च नसला तरी मेहनत खूप आहे.

- कृष्णा आखाडे,

आखाडेमुरा, ता. जावली

कास पठारावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यापासून घराचे संरक्षण करण्यासाठी डोंगरमाथ्यावर घराच्या भिंतींना झडपी बांधण्यास वेग आला आहे. (छाया : सागर चव्हाण )