शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लुटमारीतूनच खून; दहा दिवसांच्या आतच गुन्ह्याचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 12:16 IST

औंध पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत शुक्रवारी तिघांच्या मुसक्या आवळल्या. हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असल्याची माहिती औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी ‘लोकमतशी’ बोलताना दिली.

ठळक मुद्देबेकरी व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी तिघे  ताब्यात

औंध:  रहिमतपूर येथील बेकरी व्यावसायिक रविराज बाळकृष्ण लोखंडे (वय ४१) वर्षे यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी केवळ दहा दिवसांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला.राजू गेणू चव्हाण (वय २९), राहुल दत्तात्रय मेनन (वय २१, दोघेही रा. कºहाड), दत्तात्रय कृष्णत जाधव (वय २१, रा.दुशेरे, ता. कºहाड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.     रविराज लोखंडे हे मागील काही वर्षांपासून औंध, पुसेसावळी परिसरात बेकरी प्राँडक्ट विकण्याचे काम करत होते. ते आपल्या वाहनातून फिरुन बेकरी माल विकत असत. बुधवार दि.१६ रोजी रात्री ते आपले काम आटोपून टेम्पोने परत कळंबीमार्गे रहिमतपूरकडे निघाले होते. कळंबीनजीकच्या एका दूध डेअरीजवळ त्यांचे वाहन अडवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.  जादा रक्तस्त्राव झाल्यामुळे लोखंडे यांचा मृत्यू झाला होता.   हा खून नेमका कोणत्या कारणामुळे  झाला आहे. हे समोर येत नव्हते. औंध पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत शुक्रवारी तिघांच्या मुसक्या आवळल्या. हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असल्याची माहिती औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी ‘लोकमतशी’ बोलताना दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर हे करत आहेत.       या गुन्ह्यात एकूण सातजणांचा समावेश..या गुन्ह्यात एकूण सात आरोपी सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने कºहाड, सातारा, पाटण विभागात  केलेले अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

  • साता-यात दाम्पत्यावर अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हा
  • सातारा : नळावर पाणी भरू नका, असे म्हणून शिवीगाळ केल्याप्रकरणी दाम्पत्यावर शहर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सनिया उर्फ सोनाबाई सय्यद शेख व पती सय्यद शेख (रा. लक्ष्मीटेकडी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दीपक  उत्तम कांबळे (रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. घरासमोर पाणी भरत असताना सनिया शेख हिने कांबळे यांच्या आईला पाणी भरण्यापासून रोखले. तसेच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच सय्यद शेखने आईला ढकलून देऊन शिवीगाळ करून हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर शेख हे करत आहेत.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस