शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीतील अखेरच्या सभेत सारे सदस्य भावूक

By admin | Updated: January 10, 2017 22:28 IST

जिल्हा परिषदेत ठराव : ४१ विषयांना मंजुरी; महिलांशी असभ्य वागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

सातारा : खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे हे महिला पदाधिकाऱ्यांशी उर्मट भाषेत बोलले आहेत. त्यामुळे त्यांना राज्य शासनाकडे परत पाठवावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. जिल्हा ग्रामविकास निधीतून ग्रामपंचायतींनी विकासकामांसाठी मागणी केलेल्या कर्जांना मंजुरी व ग्रामपंचायतींना अंशदान वाटप या प्रमुख विषयांसह तब्बल ४१ विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा सध्याच्या सदस्यांसाठी अखेरची ठरणार असल्याने सभागृहात गहिवरलेले वातावरण पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण व अर्थ सभापती सतीश चव्हाण, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, महिला व बालकल्याण समिती सभापती वैशाली फडतरे, समाजकल्याण सभापती सुरेखा शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) रवींद्र शिवदास यांनी विषय वाचन केले. सभागृहामध्ये सदस्य राजू भोसले यांनी खटाव गटविकास अधिकाऱ्यांविषयी तक्रार केली. हाच विषय नितीन भरगुडे-पाटील यांनी उचलून धरला. महिला पदाधिकाऱ्यांशी उर्मट भाषेत बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी ‘बालाजी एंटरप्रायजेस’ नावाने बँकेत खाते काढले असून, कंत्राटदारांना या खात्यात रक्कम जमा करावी, अशी सक्ती त्यांनी केली आहे, असा आरोप केला. या अधिकाऱ्याची संपूर्ण चौकशी करून त्यांना शासनाकडे परत पाठविण्यात यावे, असा ठराव मांडण्यात आला. सदस्यांनी त्याला मंजुरी दिली. सभेत निंबोडी, ता. खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बनपेठवाडी, ता. पाटण, कोरेगाव, शिरढोण (ता. कोरेगाव), अभेपुरी, ता. वाई, नुने, ता. पाटण, विजयनगर, ता. कऱ्हाड येथील आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी देण्यात आली. बोरगाव, ता. कोरेगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या जागेचे हस्तांतर, बामणोली, ता. जावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी वापरायला देणे, मल्हारपेठ, ता. पाटण येथील पशुवैद्यकीय दवाखाना बांधकामाची ई-निविदेला मंजुरी, सासवड, ता. फलटण येथील शनिवारचा आठवडी बाजार, यशवंत आदर्श पुरस्कार निवड समिती गठीत करणे, जैविक विविधता समिती स्थापन करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. संदीप शिंदे यांनी जिहे, ता. सातारा येथील कृषी विभागाचे बिल संबंधित कंत्राटदाराला मिळाले नसल्याने त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचा विषय मांडला. स्वाती बरदाडे यांनी मतदारसंघातील खराब रस्त्याच्या कामावरून प्रशासनाला धारेवर धरले. तसेच समाजकल्याण विभागाने मंजूर केलेल्या यादीतील लाभधारकांऐवजी खंडाळा पंचायत समितीने भलत्याच लोकांना शिलाई मशीनचे वाटप केल्याचा आरोप त्यांनी केला. याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. बाळासाहेब भिलारे यांनी स्थायी समितीला ठराव मंजुरीचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी केली. अनिल देसाई, किरण साबळे-पाटील, राहुल कदम, सतीश धुमाळ, जयवंत जगताप, जालिंदर पाटील आदींनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)अपुरी विषय पत्रिका... अन् मंजुरीचा घोषसदस्यांच्या बाकावर ४१ विषयांची पूर्ण विषयपत्रिका असणे अपेक्षित होते. मात्र अनेकांच्या बाकावर ३० विषय असलेलीच विषय पत्रिका देण्यात आली होती. नितीन भरगुडे-पाटील यांनी यावर आक्षेप घेतला. आम्ही केवळ मंजूर म्हणत आहोत; पण समोर विषयपत्रिकेत त्याचा उल्लेख नाही, अशी तक्रार केली.कोनशिलेसाठी सदस्यांचा आग्रहजिल्हा परिषदेने बांधकाम केलेल्या यशवंतराव चव्हाण आॅडिटोरिअम हॉलचे उद्घाटन करण्याआधी कोनशिलेवर जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य व पंचायत समित्यांचे सभापती यांची नावे घेण्यात यावीत, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली.जलयुक्तवरून नाराजी‘जलयुक्त शिवार योजनेमध्ये सातारा, वाई, जावळी या तालुक्यांतील गावे जलयुक्त शिवार योजनेतून वगळण्यात आली आहेत.लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून धावडशी, ता. सातारा येथील पाझर तलावाचे काम अपूर्ण स्थितीत ठेवण्यात आले आहे,’ असा आरोप जितेंद्र सावंत यांनी केला. शाळांचे लाईटबिल झेडपीने भरावेजिल्हा परिषद शाळांच्या वीजबिलाचा प्रश्न गंभीर आहे. ही बिले जिल्हा परिषदेतर्फे भरण्यात यावीत, अशी मागणी राहुल कदम यांनी केली.