शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात अलिशान हॉटेल बनले जुगाराचा अड्डा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:06 IST

सातारा : लॉकडाऊनमुळे बंद असलेले साताऱ्यातील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये चक्क जुगार अड्डा सुरू असल्याचे उघडकीस आले. शहर पोलिसांच्या गुन्हे ...

ठळक मुद्देसाताऱ्यात अलिशान हॉटेल बनले जुगाराचा अड्डा..दहाजण ताब्यात; तीन लाखांचा ऐवज जप्त

सातारा : लॉकडाऊनमुळे बंद असलेले साताऱ्यातील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये चक्क जुगार अड्डा सुरू असल्याचे उघडकीस आले. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले. या छाप्यात पोलिसांनी १ लाख ३८ हजार रुपये रोख व इतर साहित्य असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.संजय लेवे, किरण लेवे, स्वप्नील काकडे, हेमंत चव्हाण, उमर मोमीन, समीर शेख, इम्तियाज सय्यद, अमोल चौगुले, संजय शिंदे, ओंकार शिंदे (सर्व रा. सातारा शहर परिसर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेले अधिक माहिती अशी, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असून, हॉटेल सुरू ठेवण्यास बंदी आहे. असे असतानाही शहरातील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

शहर पोलिसांच्या डीबीने पोलिसांचे पथक तयार केले. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकल्याचे संशयितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आधीच नाकाबंदी केली होती.

पोलिसांना हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांना रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी ताब्यात घेतली. यावेळी १ लाख ३८ हजारांची रोकड, मोबाईल, जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे फौजदार नानासाहेब कदम, पोलीस हवालदार अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, प्रशांत शेवाळे, अभय साबळे, गणेश घाडगे, किशोर तारळकर, संतोष कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर