शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘पॅडमॅन’ सिनेअभिनेता अक्षयकुमार साताऱ्यात, मराठीत बोलला...या लवकर बसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 16:45 IST

या..लवकर बसा..,असे अस्सल मराठी बोलतच प्रसिद्ध सिनेअभिनेता अक्षयकुमारने आपल्या भाषणास सुरुवात केली. मुलींनो दुर्बल नको.. निर्भय बना, अन्याय विरुद्ध लढा आणि स्वत:ची काळजी स्वत:च घ्या, असे आवाहन करतच अभिनेता अक्षयकुमारने युवक -युवतींच्या मनाचा ठाव घेतला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र पोलिसांच्या युथ पार्लमेंटनिमित्त सिनेअभिनेता अक्षयकुमार साताऱ्यात महाविद्यालयीन युवक-युवतींनी सभागृह खचाखच

सातारा : या..लवकर बसा..,असे अस्सल मराठी बोलतच प्रसिद्ध सिनेअभिनेता अक्षयकुमारने आपल्या भाषणास सुरुवात केली. मुलींनो दुर्बल नको.. निर्भय बना, अन्याय विरुद्ध लढा आणि स्वत:ची काळजी स्वत:च घ्या, असे आवाहन करतच अभिनेता अक्षयकुमारने युवक -युवतींच्या मनाचा ठाव घेतला.महाराष्ट्र पोलिसांच्या युथ पार्लमेंट या कार्यक्रमानिमित्त प्रसिद्ध सिनेअभिनेता अक्षयकुमार हा शुक्रवारी साताऱ्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अकरा वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. महाविद्यालयीन युवक-युवतींनी सभागृह खचाखच भरला होता.

अक्षयकुमारने सुरुवातीला एका छोट्या मुलीला व्यासपीठावर बोलविले. त्या चिमुकलीचा अक्षयकुमारने हात पकडला. त्यानंतर त्याने हिट मी, कमआॅन, असे म्हणून त्या मुलीला मारायला सांगितले. त्या मुलीनेही धाडस दाखवून अक्षयकुमारवर दोन ते तीन ठोसे लगावले. त्या मुलीचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.अक्षयकुमारनेही त्या मुलीचे कौतुक करतच युवतींना संदेश दिला. अक्षयकुमारला म्हणाला, महिलांच्या नैसर्गिक प्रक्रियेबाबत आपल्याकडे फारसे बोलले जात नाही. त्यामुळे महिलांची प्रचंड कुचंबना होते. मासिक पाळीमध्ये महिलांना मंदिर आणि घरातील देवाऱ्यांजवळ प्रवेश दिला जात नाही, हे बरोबर नाही. प्रत्येकाने महिलांचा आदर राखला पाहिजेच.

यावेळी अक्षयकुमारने त्याच्या एका मित्राबाबत घडलेला एक किस्सा सांगितला. अक्षय म्हणाला, रात्री दीडच्या सुमारास माझ्या मित्राची बायको आणि तिची मुलगी खोलीमध्ये हळूहळू बोलत होत्या. मुलगी सांगत होती, आई मला पिरेड्स आले आहेत. काय करू तर आईने एवढ्या रात्री कुठे जायचे?, असा प्रश्न उपस्थित केला.

माझ्या मित्राला हे समजल्यानंतर त्याने पत्नीला सोबत घेऊन दुचाकीवरून सॅनिटरी नॅपकीन आणण्याठी ते दोघे गेले. काही वेळांनंतर त्यांनी घरी येऊन आपल्या मुलीला सॅनिटरी नॅपकीन दिले. आज त्या मुलीसाठी तिचे बाबा सुपरमॅन आहेत, अशी आठवणीही अक्षयकुमारने सगळ्यांना करून दिली.या कार्यक्रमाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह साताऱ्यातील महाविद्यालयातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारkolhapurकोल्हापूर