शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार मकरंद पाटील यांच्यासह अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट, सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 12:36 IST

दोघांमध्ये सुमारे पाऊणतास विविध विषयांवर चर्चा

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, की नवीन नेतृत्व अजित पवार यांच्या गटात सामील होण्याच्या निर्णयाबाबत द्विधा मन:स्थिती झालेल्या आमदार मकरंद पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी प्रथम शरद पवार आणि नंतर अजित पवार, असा प्रवास केला. मात्र, दरवर्षीप्रमाणे गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीसाठी सर्वांनी उपस्थिती लावल्याने जिल्ह्यात सध्या ही भेट चर्चेचा विषय झाला आहे. मकरंद पाटील पुन्हा शरद पवार गटात येणार की काय, अशी आता चर्चा सुरू आहे.आमदार मकरंद पाटील आणि सहकाऱ्यांना राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्यासोबत जायचे, हा निर्णय अगतिकतेने घ्यावा लागला असला तरी तो मतदारसंघ आणि ताब्यातील सहकारी संस्थांच्या भवितव्याचा विचार करून घ्यावा लागला आहे. त्यामुळे शरद पवारांवर त्यांचे प्रेम आहेच. नुकत्याच किसन वीर साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभाच्या भाषणात त्यांनी आम्ही शरद पवारांशी निष्ठा ठेवून आहोतच.मी घेतलेली भूमिका माझ्या मतदारसंघातील काही सहकाऱ्यांना आवडली नाही; परंतु साखर कारखाना आणि मोठा मतदारसंघाच्या विकास कामांसाठी निर्णय घेतला. त्याचवेळी आमदार पाटील यांनी राजकीय तडजोडी आणि शरद पवार यांच्याशी असलेल्या निष्ठेबाबत भाष्य करून आपली भूमिका स्पष्ट केली होती. तरीही शरद पवार निष्ठावंतांशी वेगवेगळी चर्चा आ. पाटील यांच्या मतदारसंघात करत होते. त्यामुळे या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.या भेटीत शरद पवार यांनी आवर्जून किसन वीर कारखाना व खंडाळा कारखान्यांचे गाळप सुरू झाले का, काही अडचणी आहेत का, याची माहिती मकरंद पाटील यांच्याकडून घेतली. दरवर्षी दिवाळी पाडव्यादिवशी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते येत असतात. आमदार मकरंद पाटील दरवर्षी तिथे हजेरी लावत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही बहुतांशी आमदारांनी पाडव्यादिवशी शरद पवार यांची भेट घेतली.आमदार मकरंद पाटील आणि दोघांमध्ये सुमारे पाऊणतास विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, शामराव गाडवे, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर हे उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMakarand Patilमकरंद पाटीलSharad Pawarशरद पवार