शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘अजिंक्यतारा’चे मैदान कौस्तुभने मारले १०९ कुस्त्या निकाली : हजारो शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:35 IST

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गुरुवारी झालेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान कौस्तुभ डाफळे आणि पैलवान ज्ञानेश्वर गोचडे यांच्यातील कुस्ती चांगली रंगली. या लढतीत पैलवान कौस्तुभने ज्ञानेश्वरला चितपट करून विजय मिळविला.

विजेत्या मल्लांना आमदार शिवेंद्रसिंहराजे व मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील खास आकर्षण असलेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान कौस्तुभ डाफळे (राष्ट्रीय चॅम्पियन, काका पवार तालीम पुणे) याने प्रतिस्पर्धी पैलवान ज्ञानेश्वर गोचडे (पुणे) याचा पराभव केले. या मैदानात १०९ निकाली कुस्त्या झाल्या आणि रंगतदार कुस्त्यांमुळे उपस्थित हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत सातारा तालुक्यातील जनतेच्या वतीने सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित जुने हिंदकेसरी व महाराष्टÑ केसरी तसेच जुने नामांकित मल्ल कुस्ती कोच पैलवान व वस्ताद आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.स्पर्धेसाठी सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणावरुन आले होेते. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीस प्रारंभ होताच दोघांनी एकमेकाचा अंदाज घेत चढाई केली. मात्र दोघांचेही बलाबलसमान ठरल्यामुळे पैलवान कौस्तुभ डाफळे हा पंचांच्या गुणावर विजयी झाला.दोन नंबरची कुस्तीमध्ये पै. योगेश बोंबाळेने पै.गोकूळ आवारेला चितपट करुन विजयी झाला. तीन नंबरची कुस्तीमध्ये पैलवान विकास जाधवने पै. सोनूचा पराभव करुन विजयी झाला. चौथ्या कुस्तीत पै. राजन तोमरने पै. अमोल फडतरेचा पराभव करुन विजयी ठरला.

पाचव्या कुस्तीत पै.नीलेश लोखंडेने प्रेमकुमारचा पराभव करुन विजयी ठरला. कुस्ती पंच म्हणून उत्तमराव पाटील, दिलीप पवार, सदाशिव गायकवाड, कांता जाधव, पैलवान नंदकुमार जगदाळे,पैलवान जितेंद्र कणसे यांनी काम पाहिले. पै. शंकर पुजारी, पांडुरंग कणसे यांनी समालोचन केले. हलगीवादक मारुती मोरे यांनी हलगी वादन केले.भाऊसाहेब यांच्या स्मृतीसाठी पुन्हा आखाडा‘दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी आखाडा सुरू करण्याची मुहूर्तमेढ रोवली होती. मध्यंतरी खंड पडला होता. परंतु त्यांची स्मृती जागविण्याच्या दृष्टीने पुन्हा सर्वांच्या सहकार्याने आखाडा सुरू करण्यात आला आहे. यापुढेही यापेक्षा दर्जेदार आखाडा आणि मोठ-मोठ्या कुस्त्या घेण्यात येतील.असा मनोदय व्यक्त केला. तसेच कुस्ती जिवंत राहिली पाहिजे, कुस्तीला चालना मिळाली पाहिजे, ग्रामीण भागात चांगले मल्ल तयार झाले पाहिजेत, यासाठी गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबिवला जात असून, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSportsक्रीडा