शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

कृषीमंत्र्यांची अग्रीमची घोषणा; दिवाळीपूर्वी मिळण्याबाबत साशंकता

By नितीन काळेल | Updated: October 18, 2023 18:40 IST

विमा कंपन्यांची उदासीनताच : सातारा जिल्ह्यातील तब्बल ६३ मंडले पात्र 

सातारा : राज्यात खरीपात २१ दिवसांचा पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत शासनपातळीवर बैठका झाल्या. कृषीमंत्र्यांनीही दिवाळीपूर्वी अग्रीम देण्याची घोषणा केली. मात्र, विमा कंपन्यांकडून विविध कारणे सांगून टाळाटाळ होत आहे. यामुळे दिवाळीपूर्वी अग्रीम रक्कम मिळणार का ? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. तर यासाठी सातारा जिल्ह्यातील ६३ मंडले पात्र ठरलेली आहेत.  शेतकऱ्यांना नैसर्गिक संकट, दुष्काळ तसेच अतिवृष्टी आदी काळात मदत होण्यासाठी शासनाच्या वतीने पीक विमा योजना राबविण्यात येते. खरीप आणि रब्बी हंगामातील पिके तसेच फळबागांसाठीही ही योजना आहे. यावर्षीच्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देऊ केला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या पावणे तीन लाखांच्या घरात आहे. पण, खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने राज्यातील शेकडो मंडले नुकसान भरपाईसाठी पात्र ठरत आहेत. त्यातील ६३ मंडले सातारा जिल्ह्यातील आहेत.  शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी विविध कारणे आहेत. यामधील एक म्हणजे हंगामात प्रतिकूल परिस्थितीत सलग २१ दिवस पावसाचा खंड राहिल्यास त्या मंडलातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळते. सातारा जिल्ह्यातील अशा मंडलची संख्या ६३ आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील सर्वाधिक १३ मंडले आहेत. यानंतर खटाव तालुक्यातील ९, कोरेगाव ८, फलटण ७, सातारा तालुका ६, वाई, पाटण आणि माण तालुक्यातील प्रत्येकी ५, खंडाळ्यातील ३ आणि जावळीतील २ मंडलांचा समावेश आहे.सातारा जिल्ह्यातीलच मंडलांची संख्या ६३ असताना राज्यातील आकडा शेकडोच्या घरात आहे. यापार्श्वभूमीवर कंपन्यांकडूनही जोरदार हालचाली सुरू नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांनीही अग्रीम देण्याबाबत सूचना केली. याला १५ दिवस होत आले आहेत. त्यातच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही नगर येथील कार्यक्रमात पात्र शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम दिवाळपूर्वी शेतकऱ्यांना मिळेल, अशी घोषणा केली. पण, अजूनही विमा कंपन्याकडून म्हणावा असा प्रतिसाद नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणार का ? याविषयी साशंकता आहे. 

साताऱ्यात पावणे दोन लाख अर्जधारकांना फायदा..सातारा जिल्ह्यातील ६३ महसूल मंडलात सलग २१ दिवस किंवा त्याहून अधिक पावसाचा खंड राहिलेला आहे. त्यामुळे या मंडलांतील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळू शकते. सुमारे १ लाख ७३ हजार एेवढी विमा घेतलेल्या अर्जधारकांची संख्या आहे. तर भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, खरीप कांदा या ९ पिकांसाठी विमा योजना होती.

९ मंडलांनाही मिळू शकतो लाभ..हंगामात २१ दिवसांपेक्षा कमी पावसाचा खंड असेल पण,५० टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान असल्यास अशा मंडलातही अग्रीम रक्कम देण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आणखी ९ मंडलांना लाभ मिळू शकतो. यामध्ये सातारा तालुक्यातील अपशिंगे, अंबवडे, शेंद्रे, फलटणमधील गिरवी, वाठार निंबाळकर आणि माण तालुक्यातील वरकुटे मलवडी, म्हसवड, शिंगणापूर आणि मार्डी मंडलाचा समावेश आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी