शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दांडिया संपल्यानंतर तरुणांकडून हवेत गोळीबार

By दत्ता यादव | Updated: October 5, 2022 13:28 IST

चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; एक अल्पवयीन मुलगा ताब्यात

सातारा: दांडिया संपल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास गाडी काढताना दुचाकीचे चाक पायावरुन गेल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. याचे पर्यावसन फायरिंगमध्ये झाले. एका तरुणाने हवेत फायर करून दहशत माजवली. या प्रकारनंतर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले तर चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अमीर शेख, अभिजीत भिसे, साहिल सावंत आणि आहात (सर्व रा. सातारा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा गुन्हा दाखल झालेल्या मध्ये समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यात नवरात्रोत्सव काळात अनेक ठिकाणी दांडिया आणि गरबाचे आयोजन करण्यात आले होते. पोवई नाक्यावर एका खाजगी शाळेत दांडिया खेळाचे आयोजन करण्यात आलं होतं. रात्री 12 पर्यंत दांडियाचा खेळ सुरु होता. दांडिया खेळण्यासाठी तरुणाईचा जोश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. दांडिया संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात युवकांची झुंबड मैदानाबाहेर पडली. यावेळी गाडी काढताना दुचाकीचे चाक पायावरुन गेल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. वादाने ढोणे कॉलनीत उग्र रूप धारण केले. एका तरुणाने हवेत फायरिंग केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली.

मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेणे सुरु केलं. त्यावेळी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आमिर शेख या संशयितांने फायरिंग केलं असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.  आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या दोन टीम तयार करण्यात आले असून या टीम सातारा शहरसह आजूबाजूच्या परिसरात आरोपींचा शोध घेत आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार