शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात राजकीय जुगलबंदी; आम्हाला पण दाढी हाय, नादाला लागायचं नाय; जयकुमार गोरेंची शिंदेसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:45 IST

रामराजे यांना पुन्हा एकदा ‘शकुनी मामा’ म्हणत खोचक टीका

सातारा : सातारा जिल्ह्यातील महायुतीतील पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकासमंत्री यांच्यातील वाकयुद्ध चांगलेच रंगले आहे. फलटणला भाजपच्या विजयी उमेदवारांच्या आभार मेळाव्यात मंत्री गोरे यांनी रामराजे आणि शिंदेसेनेवर टीका केली. आम्हाला पण दाढी आहे, असे सांगत आमच्या नादाला लागायचे नाय, असा इशारा दिला होता. याला पालकमंत्री देसाई यांनी मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही, असा इशारा देत जशास तसेच उत्तर दिले.सातारा जिल्ह्यात बहुतांशी नगरपालिका निवडणुकीत महायुती झालीच नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप स्वतंत्रच लढली. त्यावेळीही महायुती अंतर्गत एकमेकांवर टीका करण्यात आली. आता निकालानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले आहेत. याचेच पडसाद फलटणमधील भाजपच्या विजयी उमेदवारांच्या मेळाव्यात गुरुवारी उमटले.

‘शकुनी मामा’ म्हणत खोचक टीका...मंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली. मंत्री गोरे यांनी रामराजे यांना पुन्हा एकदा ‘शकुनी मामा’ म्हणत खोचक टीका केली. तसेच त्यांनी आपल्या भाषणात शिंदेसेनेवरही टीका केली. ‘दाढीवर हात फिरवत कोणीतरी या ठिकाणी आलं आणि इथे दहशत चालत नाही,’ असे बोलले होते. त्यांना मला सांगायचे आहे. याआधीही कोरेगावचे आले, उत्तरचे आले आणि आता फलटणचे. पण, दहशत आम्हाला चालत नाही आणि आम्हाला, पण दाढी आहे, असे सांगत आमच्या नादाला लागायचे नाही, असा इशारा त्यांनी दिला.

दहशतीच्या भाषेस जशास तसे उत्तर...मंत्री गोरे यांनी फलटण येथील मेळाव्यात दिलेल्या इशाऱ्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही त्यांना जोरदार उत्तर दिले. “माझा नाद करायचा नाही, असं जयकुमार गोरे म्हणतायत, याचाच अर्थ दहशत कोणाची आहे हे समजून जावं. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही. तसेच जिल्हा दहशत कधीच खपवून घेणार नाही. त्यामुळे इथून पुढे दादागिरी, दमदाटी, दहशतीची भाषा केली, तर त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल,” अशा शब्दांत मंत्री देसाई यांनी गोरे यांना उत्तर दिलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Political battle in Satara; Gore criticizes Shinde Sena, warns against confrontation.

Web Summary : Satara witnesses a political feud as ministers Shambhuraj Desai and Jaykumar Gore clash. Gore warns Shinde Sena against intimidation, while Desai vows to counter any attempts at creating fear in the district with equal force.