शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांची पटली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:45 IST

नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने नाईलाजास्त पोलिसांना अखेर संबंधित मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करावे लागले. मात्र, चौदाव्या दिवशी नातेवाईकांची ओळख पटली. सख्या भावावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने झोरे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

ठळक मुद्देबेवारस अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांची पटली ओळखसाताऱ्यातील घटना; झोरे कुटंबीय शोकसागरात बुडाले

सातारा: नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने नाईलाजास्त पोलिसांना अखेर संबंधित मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करावे लागले. मात्र, चौदाव्या दिवशी नातेवाईकांची ओळख पटली. सख्या भावावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने झोरे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात २४ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. उपचारादरम्यान संबंधित व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी आपले नाव उत्तम विठोबा झोरे (रा. सिंदगी, जि. विजापूर) असे सांगितले. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी झोरे यांचा उपचारादरम्यान सिव्हिलमध्ये मृत्यू झाला.पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरूवात केली. मृत्यूपूर्वी झोरे यांनी कर्नाटकातील विजापूर येथील पत्ता सांगितला होता. त्या पत्त्यावर जाऊनही पोलिसांनी चौकशी केली. मात्र, नातेवाईक काही सापडत नव्हते.

झोरे यांचा मृत्यू होऊन पाच ते सहा दिवस झाले होते. त्यामुळे शवागृहात दुर्गंधी पसरली होती. नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने अखेर पोलिसांनी झोरे यांच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मृतदेह दफन करण्यात आला. त्यांच्याजवळ असलेली बॅग आणि अन्य साहित्य पोलिसांनी आपल्याजवळ ठेवून घेतले.दरम्यान, तब्बल चौदा दिवसांनंतर झोरे यांचा भाऊ, भाचा हे जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. यावेळी त्यांनी भावाची बॅग आणि पोलिसांजवळील फोटो पाहून हे उत्तम झोरेच असल्याचे सांगितले. मात्र, ओळख पटूनही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने झोरे कुटुंबीयांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.साताऱ्यातील मंगळवार पेठ आणि शाहूपुरी परिसरात झोरे कुटुंबीय वास्तव्यास आहे. एवढ्या जवळ असतानाही आपण त्यांना शेवटचे पाहू शकलो नाही, याची खंत मनात घेऊन जड पावलांनी झोरे कुटुंबीय सिव्हिलमधून घरी निघून गेले. जाताना मात्र, त्यांनी मृत झोरे यांची बॅग आठवण म्हणून घरी नेली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस