शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राजकीय परिणामाचा विचार न करता बधितांना विलगिकरण कक्षात दाखल करा: रामराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 16:04 IST

corona virus phaltan Satara : गृह विलगिकरणात असणारे कोरोना बाधित योग्य काळजी घेत नसल्याने त्यातून आजूबाजूला बाधित रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे अशा रुग्णांना घरी थांबू न देता कार्यकर्त्यांनी भले वाईटपणा स्वीकारून त्यांना वेळीच इतर मोठ्या विलगिकरण कक्षात दाखल करावे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

ठळक मुद्देराजकीय परिणामाचा विचार न करता बधितांना विलगिकरण कक्षात दाखल करा: रामराजे तरडगावजवळील चांदोबाचा लिंब येथे १०१ बेडच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

तरडगाव : गृह विलगिकरणात असणारे कोरोना बाधित योग्य काळजी घेत नसल्याने त्यातून आजूबाजूला बाधित रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे अशा रुग्णांना घरी थांबू न देता कार्यकर्त्यांनी भले वाईटपणा स्वीकारून त्यांना वेळीच इतर मोठ्या विलगिकरण कक्षात दाखल करावे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.फलटण तालुक्यातील तरडगाव येथील चांदोबाचा लिंबजवळील हिंदवी पॅलेसमध्ये उभारण्यात आलेल्या १०१ बेडच्या कोरोना विलगिकरण कक्षाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते या कक्षाचे उदघाटन झाले. यावेळी आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ग्रामीण भागात सध्या रुग्णाचे प्रमाण जास्त आहे. यासाठी तालुका पातळीवर संजीवराजे हे तलाठी, ग्रामसेवक आदी पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठका घेत आहेत. तरी लोक ऐकत नाहीत. ही मोठी वाईट परिस्थती आहे. आम्ही औषध व ऑक्सिजन आणतोय. बंद पडलेली कंपनी सुरू केली. ऑक्सिजन प्लांट दिले आहेत.

कार्यकर्त्यानो वाईटपणा आला तरी आपलं काम सुरू ठेवा. शासन हे आपल्या परीने काम करीत आहे. अनेक ठिकाणी मोठी विलगिकरण कक्ष आहेत. काही गावातील शाळांमध्ये असे कक्ष तयार केले आहेत. तरी रुग्ण यामध्ये येतच नाहीत. तालुक्याच्या भल्यासाठी कटुता आली तरी येऊ द्या, राजकीय परिणामाची वेळ आली तरी होऊ द्या. मात्र तालुक्याचा विचार हा आपल्यालाच करावा लागणार आहे.यावेळी पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, उपसभापती रेखा खरात, माजी सभापती वसंतराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, पंचायत समिती सदस्या विमल गायकवाड, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम, सरपंच जयश्री चव्हाण उपस्थित होते.दहा गावांचा लोकसहभागकक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांना मुबलक सुविधा पुरविण्यासाठी परिसरातील दहा गावांनी लोकसहभागातून पुढाकार घेतला आहे. कक्षात दोन वेळच्या जेवणाची व नाश्त्याची सोय केली गेली आहे. विविध ग्रामपंचायतीने बाधितांसाठी बेड उपलब्ध केले आहेत. ग्रामसेवक संघटनेने उशा व गाद्या दिल्या आहेत. पहिल्या दिवशी कक्षात नऊ रुग्ण दाखल झाले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरphaltan-acफलटणSatara areaसातारा परिसर