शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अजेंड्यावरून प्रशासनाला धरले धारेवर! वाई नगरपालिका सभा : सदस्यांची नाराजी; सभागृहात बराचवेळ गोंधळाची स्थिती, खुलासा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:44 IST

पसरणी : शासनाकडून सर्वसाधारण सभेचा अजेंडा उशिरा मिळाल्याने सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाºयांना धारेवर धरले. अभ्यास करण्यासाठी सभा एक दिवस उशिरा

पसरणी : शासनाकडून सर्वसाधारण सभेचा अजेंडा उशिरा मिळाल्याने सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाºयांना धारेवर धरले. अभ्यास करण्यासाठी सभा एक दिवस उशिरा घेण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. या मुद्द्यावरून सभागृहात बराचवेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

वाई नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील आठही विषय एकमताने मंजूर करण्यात आले. प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच अजेंडा उशिरा मिळाल्याने नाराजी व्यक्त करत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अजेंडा उशिरा का दिला? याबाबत प्रशासनाने खुलासा करावी, अशी मागणी सर्व सदस्यांनी करत अभ्यास करण्यासाठी वेळा द्यावा व ही सभा दुसºया दिवशी घ्यावी, असे सुचवले. मात्र, प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न आल्याने सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मुख्याधिकाºयांच्या खुलाशानंतर कामकाजास सुरुवात झाली.

शहराला पाणीपुरवठा करणाºया जलउपसा केंद्र्रामधून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पुरेशा दाबाने दिवसातून दोनदा पाणीपुरवठा करण्यासाठी १२० एचपी क्षमतेचा पंपसेट बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी लागणाºया ६ लाख रुपये किमतीच्या २०० केव्हीए ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असल्याने आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून वीज कंपनीच्या योजनेतून हे काम मार्गी लावल्यास पालिकेचे सहा लाख रुपये वाचतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी पालिका प्रशासन आमदार पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.

नगरपालिका शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठीही यावेळी दोन लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील एक लाख रुपयांचा निधी तत्काळ वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व सदस्यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट, पुणे (यशदा) येथे प्रशिक्षण कार्यशाळेत भाग घेता यावा, अशी आग्रही मागणी नगरसेविका रेश्मा जायगुडे यांनी केली. त्याला इतर सर्व महिला सदस्यांनी पाठिंबा दिला. याबाबत प्रशासनाच्या वतीने यशदा या संस्थेशी संपर्क साधावा, असा निर्णय घेण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत करण्यात येणाºया शहरातील विविध विकासकामांसाठी आलेल्या कमी दराच्या ई-निविदांना मंजुरी देण्यात आली. रस्ते बांधकाम, स्वेच्छानिवृत्ती आदी विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरात सुरू असलेल्या गतिमान कामकाजाबाबत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व ब्रँड अ‍ॅम्बेसिडर, सामाजिक संस्था, नागरिक यांचा कौतुकाचा ठराव करण्यात आला. विषय समिती व स्थायी समितीचे सभापती यांच्याही कौतुकाचा ठराव करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी आर्थिक व वस्तू स्वरुपात मदत करणाºया विविध कंपन्या, बँका, पतसंस्था यांच्याही कौतुकाचा ठराव करण्यात आला. राज्यस्तर पर्यटन विकासनिधीतून दोन कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल आ. मकरंद पाटील, किसन वीर कारखान्यास सर्वोत्कृष्ट डिस्टिलरी पुरस्कार मिळाल्याबद्दल मदन भोसले, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटपदी निवड झाल्याबद्दल अ‍ॅड. जगदीश पाटणे आदींच्या कौतुकाचा ठराव झाला.निधी उपलब्ध केल्याबद्दल कौतुक..स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत वाई नगरपालिकेने शहरातील स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, यासाठी प्रशासन व सर्वच नगरसेवक एकजुटीने या अभियानात सक्रिय झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक दीपक ओसवाल यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करीत आहेत. त्यांनी स्वत: विविध कंपन्या, उद्योजक यांच्या माध्यमातून प्रत्येक घरात देण्यासाठी चौदा हजार डस्टबीन उपलब्ध करून दिला आहे. शहरातील भिंती रंगविण्यासाठी तसेच पालिका परिसर व अन्य ठिकाणी वृक्षलागवडीसाठीही व्यक्ती व संस्थांकडून सुमारे आठ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्याही कौतुकीचा ठराव यावेळी सभागृहात नगरसेविका शीतल शिंदे यांनी मांडला.