शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा येत्या मंगळवारी पाटणमध्ये!, शंभूराज देसाईंवर तोफ डागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 19:44 IST

बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम

प्रमोद सुकरेकराड : एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात फूट पडली. यानंतर आता युवानेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरूवात केली आहे. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम ते करीत आहेत. येत्या मंगळवारी दि. २ ऑगस्टला आदित्य ठाकरे माजी गृहराज्यमंत्री व बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात येणार आहेत. यावेळी ते काय तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील  दोन आमदार असल्याने ते दौर्यावर येत आहेत. आमदार शंभूराज देसाई हे पाटण मतदार संघातून तर आमदार महेश शिंदे हे कोरेगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.  त्यामुळे आदित्य ठाकरे या दोघांवर काय तोफ डागणार हे पहावे लागेल.निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा  १ व २ ऑगस्टला सिंधुदुर्ग, कोल्हापुर, पाटण, सातारा, पुणे असा असणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य ठाकरे एक ऑगस्टला सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्यात यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याकरीता दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती मिळते. मंगळवारी दुपारी २ वाजता पाटण येथे निष्ठा यात्रा येणार आहे. तेथून ते पुढे पुण्याकडे रवाना होणार आहेत.

निसरे फाटा येथे होणार स्वागत

पाटण मतदार संघात आमदार  शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्यात आदित्य ठाकरे येणार आहेत. निसरे फाटा येथे निष्ठा यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून तेथून मल्हारपेठ पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. तेथे आमचे नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तेथून ते उंब्रज मार्गे पुण्याकडे रवाना होतील . - हर्षद कदम, जिल्हाप्रमुख

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाShambhuraj Desaiशंभूराज देसाई