शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

साताऱ्यातील तरुणाने कंठावर गोंदली बाबासाहेबांची स्वाक्षरी, विचार समाजमनात रुजविण्याचा उचलला विडा 

By सचिन काकडे | Updated: January 15, 2024 18:18 IST

गेल्या पाच वर्षांपासून चळवळीत करतोय काम

सातारा : अलिकडच्या काही वर्षांत तरुणाईमध्ये ‘टॅटू’ संस्कृती रुजू लागली आहे. कोणी आपल्या हातावर आई-वडिलांचा फोटो तर कोणी आवडत्या व्यक्तीचे नाव टॅटूने काढतो. मात्र, साताऱ्यात राहणाऱ्या आदित्य गायकवाड या तरुणाने आपल्या कंठावर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी कोरून त्यांचे विचार समाजमनात रुजविण्याचा विडा उचलला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साताऱ्याचे ऋणानुबंधाचे नाते होते. येथील छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये त्यांचे पाऊल पडलेच नसते तर ते सुशिक्षित व प्रज्ञावंत होणे शक्य नव्हते. महत्त्वाचे म्हणजे जगात ज्याचे आजही स्वागत केले जाते ते लोकशाहीप्रधान संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून निर्माण झाले नसते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी, त्यांचे विचार समाजमनात रुजविण्यासाठी व गोरगरिबांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी साताऱ्यातील आदित्य गायकवाड गेल्या पाच वर्षांपासून चळवळीत काम करत आहेत. आपल्या कंठावर बाबासाहेबांची स्वाक्षरी टॅटूने कोरावी, अशी कल्पना त्याच्या मनात आली आणि त्याने ती सत्यात उतरविली. त्याची ही स्वाक्षरी अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

बाबासाहेबांच्या शिक्षणाचा प्रवास साताऱ्यातून सुरू झाला. त्यांनी बहुजनांना खऱ्या अर्थाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. अशा महामानवाचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. मात्र, त्यांचे कार्य तळागाळात निश्चितच पोहचवू शकतो. यासाठीच कंठावर बाबासाहेबांची स्वाक्षरी कोरली असून, ती प्रेरणा व काम करण्याचे बळ देते. - आदित्य गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष रिपाइं, गवई गट)

टॅग्स :Satara areaसातारा परिसर