शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 17:43 IST

Mahabaleshwar Hill Station Sataranews- महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व डंपर अशा दोन वाहनांवर २ लाख ३२ हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती तहसीलदार सुषमा पाटील चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देगौणखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई महसूल विभाग आक्रमक : दोन लाख ३२ हजारांचा दंड वसूल

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व डंपर अशा दोन वाहनांवर २ लाख ३२ हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती तहसीलदार सुषमा पाटील चौधरी यांनी दिली.

महाबळेश्वरमधील खेड्यापाड्यातील निसर्गरम्य ठिकाणातील काही भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. बांधकामास उठावदारपणा किंवा जुन्याकाळी बंगल्याचा रुबाब यावा, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लाल चिऱ्याच्या दगडामध्ये बांधकाम करण्याची फॅशन आली आहे.

या दगडाची महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे दगड पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामधून महाबळेश्वरमध्ये येतात. दगड आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रक व डंपरची वाहतूक आंबेनळी घाटातून सतत होत असते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास महाबळेश्वर येथील डंपर (एमएच ११ सीएच ६८६१) व ट्रक (एमएच ११ एएल ४८२५) या दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दोन्ही वाहनांमध्ये दगडी चिराच असल्याचे स्पष्ट झाले.

ही कारवाई महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत. यापुढेही अशीच कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मंडलाधिकाऱ्यांनी दिला. 

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसरTahasildarतहसीलदार