शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, माती सम्राटांचे धाबे दणाणले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:53 IST

रामापूर : कोयना नदी काठावरून मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा धडाका प्रांताधिकारी सुनील गाढे ...

रामापूर : कोयना नदी काठावरून मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा धडाका प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी लावला आहे. तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनाही अवैध माती उत्खननावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे माती सम्राटांचे धाबे दणाणले आहे. कारवाई अखंडित सुरू ठेवण्याची मागणीही जनतेतून केली जात आहे.माती उत्खनन केलेल्या ठिकाणचे महसूल विभागाकडून तातडीने पंचनामे करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. कोयना नदीकाठावरील नेरळे ते नावडीपर्यंत ठिकठिकाणी मातीचे उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन करत असताना महसूल प्रशासनाची परवानगी घेतली असली तरी प्रत्यक्षपणे उत्खनन मात्र मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. जमिनीच्या खाली १५ ते २० फूट उत्खनन राजरोज सुरू होत आहे. टीचभराचा परवाना आणि हातभर उत्खनन करण्यात येत असल्याने कोयनाकाठ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

दररोज शेकडोंच्यावर नियमबाह्य मातीने भरलेली चारचाकी वाहने ये-जा करत असतात. माती उत्खनन केल्याने पावसाळ्यात नदीकाठावरील अनेक गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. याचा अनुभव गेल्या दोन वर्षांत नदीकाठी असणाऱ्या गावांना आणि शेतकऱ्यांना आला आहे. 

दि. २९ रोजी अचानक प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी नियमबाह्य माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा धडाका सुरू करून दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. तालुक्यात अशा पद्धतीने अवैध माती उत्खनन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही प्रांताधिकारी गाढे यांनी तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांना दिल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील माती सम्राटांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत सातत्य ठेवून नदीकाठीच्या शेतीचे आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे, अशी मागणीही जनतेतून केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर