शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

ग्रामपंचायतींचे वेतन ४ तारखेच्या आत खात्यात -विलंब झाल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:38 IST

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आता रखडल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाºयांचे वेतन महिन्याच्या १ ते ४ या तारखेदरम्यान करण्याचे आदेश ग्रामविकास

ठळक मुद्देझेडपीचे ११ पंचायत समित्यांना आदेश

सागर गुजर ।सातारा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आता रखडल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाºयांचे वेतन महिन्याच्या १ ते ४ या तारखेदरम्यान करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व ग्रामपंचायतींना त्याबाबत सूचना केल्या आहेत.

ग्रामपंचायतींमध्ये कर्मचारी पूर्णवेळ काम करतात, मात्र त्यांना शासकीय दर्जा नाही. लोकसंख्येनुसार काही हिस्सा राज्य शासन आणि काही हिस्सा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जमा करून या कर्मचाºयांना वेतन दिले जाते. ग्रामपंचायत कर्मचाºयांना वेळेत वेतन मिळत नव्हते. अनेकदा ५ ते ६ महिने वेतनच दिले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार जिल्हा परिषदांकडे येत होत्या.

आता शासन आदेशानुसार महिन्याच्या १ ते ४ तारखांदरम्यान शासन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्मचाºयांच्या खात्यावर वेतन जमा करेल. त्याच कालावधीत ग्रामपंचायतींनीही आपला हिस्सा जमा करणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कारवाई होऊ शकते.जिल्ह्यामध्ये २ हजार ५८३ ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी २ हजार ३४३ कर्मचाºयांची माहिती पंचायत समितीच्या माध्यमातून भरून घेण्यात आली आहे. उरलेल्या २४० कर्मचाºयांपैकी २२० पदे रिक्त आहेत, तर २० कर्मचाºयांच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे.

या सर्व कर्मचाºयांची संपूर्ण माहिती आॅनलाईन नोंदवण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना करण्यात आली आहे.दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या किमान वेतनाच्या राज्य हिश्श्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यांत आॅनलाईन पद्धतीने जमा करण्याच्या अनुषंगाने एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंतची देयके ग्रामसेवकाने सादर करून ती आॅनलाईन प्रणालीमध्ये भरून ती जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आली होती.मागील देयके देण्याचे आदेशही शासनाने दिले होते. जिल्हा परिषदेने त्यानुसार कार्यवाही केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना कर्मचाºयांचे वेतन आडवता येणार नाही. रात्री-अपरात्री जागे राहून सेवा बजावणाºया ग्रामपंचायत कर्मचाºयांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०१८ अखेरच्या वेतनाचा राज्य शासनाचा हिस्सा जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे. पुढील कालावधीत सर्वच कर्मचाºयांना महिन्याच्या १ ते ४ या कालावधीत वेतन मिळू शकेल.- अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMONEYपैसा