शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दोन खुनातील आरोपीला साताऱ्यात अटक; चार वर्षांनंतर कारवाई, सात दिवस पोलिस कोठडी

By दत्ता यादव | Updated: April 29, 2023 14:48 IST

 जिल्हा न्यायालयात येणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळाली

सातारा : दोन खून केल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून पसार असलेल्या सराईत आरोपीला न्यायालयातील पोलिसांनी साताऱ्यात शिताफिने पकडले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.

रोशन अविनाश उर्फ अँडीसन भोसले (वय ३९, रा. इंदिरानगर झोपडपट्टी अकलूज, ता. माळशीरस, जि. सोलापूर, सध्या रा. कापशी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोशन भोसले याने २०२० मध्ये फलटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन खून केले होते. या खुनाच्या आरोपासह त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, राष्ट्रीय अपत्ती कायद्याचे उल्लंघन करणे यासारखे गंभीर गुन्हे फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून तो फलटण पोलिसांना गुंगारा देत होता.

शुक्रवारी सायंकाळी तो जिल्हा न्यायालयात येणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने आरोपीला पकडण्यासाठी एक पथक तयार केले. या पथकामध्ये जिल्हा न्यायालयात असलेले सहायक फाैजदार संतोष कदम, सहायक फाैजदार संजय पाटील, हवालदार चंद्रकांत धापते, काकासाहेब कर्णे यांचा समावेश केला. या पथकाने रोशन भोसलेवर दिवसभर पाळत ठेवली.

सायंकाळी तो न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या शेजारून चालत निघाला होता. त्यावेळी या पथकाने झडप घालून त्याला पकडले. त्यानंतर त्याला फलटण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले असता त्याला ३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, फलटणचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.  

अटकपूर्व जामिनासाठी ‘तो’ न्यायालयात..

रोशन भोसले हा अटकपूर्व जामीन घेण्यासाठी न्यायालयात आला होता. मात्र, पोलिसांची नजर चुकवून तो तेथून निघाला होता. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. चार वर्षांपासून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जीवाचे रान केले. अखेर तो सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस