शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: टोकदार वस्तूने पोटावर वार, पोलिस कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By दीपक शिंदे | Updated: October 9, 2023 18:40 IST

हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले

कऱ्हाड : गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत स्वत:वर टोकदार शस्त्राने वार करून घेऊन तसेच भिंतीवर डोके आपटून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी, (दि. ४) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सोनू उर्फ संजीव कपूरसिंग टाक (वय २८, रा. हडपसर, गाडीतळ, तुळजाभवानी वसाहत, ससाणेनगर, पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी सोनू उर्फ संजीव टाक याला न्यायालयाच्या आदेशानुसार वर्ग करण्यात आले होते. आरोपी टाक हा येरवडा कारागृहात होता. न्यायालयाकडील ट्रान्सफर वॉरंटवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुरूवारी सायंकाळी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी त्याला अटक करण्यात आले. तसेच लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. लॉकअपमध्ये जमा करताना तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपी टाक याची अंगझडती घेतली. मात्र, त्याच्याकडे काहीही आढळून आले नाही. त्यानंतर त्याला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास लॉकअपमध्ये आरोपी सोनू उर्फ संजीव टाक याने बाथरूममध्ये डोके आपटण्यास सुरुवात केली.हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने स्वत:च्या पोटावर टोकदार वस्तूने जखमा करून घेतल्याचे आढळून आले. तसेच भिंतीवर डोके आपटल्याने डोक्यालाही जखम झाली होती. पोलिसांनी त्याला तातडीने वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस