शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात चोरट्याकडून चार दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:03 IST

सातारा तालुक्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जितेंद्र उर्फ बबन हिंदूराव मोरे (वय २३, रा. गजवडी, ता. सातारा) याला अटक केली असून, त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

ठळक मुद्देसाताऱ्यात चोरट्याकडून चार दुचाकी जप्तपोलीसी खाक्या दाखविताच मोटारसायकली चोरल्याची कबुली

सातारा : सातारा तालुक्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जितेंद्र उर्फ बबन हिंदूराव मोरे (वय २३, रा. गजवडी, ता. सातारा) याला अटक केली असून, त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

एक युवक विविध प्रकारच्या दुचाकी वापरत असल्याची माहिती डीबी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, राजू मुलाणी, रमेश चव्हाण, संदीप कुंभार यांना संबंधित युवकाला पकडण्यासाठी पाठविले. पोलिसांनी सापळा लावून गजवडी परिसरात युवकाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने जितेंद्र मोरे असे त्याचे नाव सांगितले. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

अखेर त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने चार मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याने घराच्या परसिरात लपवून ठेवलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी त्याने शाहूपुरी आणि सातारा शहर परिसरातून चोरल्या असल्याचे तपासात पुढे आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर