शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

‘ब्रीज कोर्स’द्वारे भरून काढणार शैक्षणिक पोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST

सातारा : कोरोनामुळे प्राथमिक शाळा गतवर्षी मार्च २०२० पासून बंद आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने मुलांना ऑनलाईन ...

सातारा : कोरोनामुळे प्राथमिक शाळा गतवर्षी मार्च २०२० पासून बंद आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने मुलांना ऑनलाईन अध्यापन स्वाध्याय पुस्तिका व अन्य मार्गांनी सुरू आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ब्रीज कोर्स तयार केला आहे. अध्यापनातील दरी भरून काढण्यासाठी ब्रीज कोर्सचे अध्यापन शिक्षकांना करावे लागणार आहे.

खासगी व शासकीय शाळेतील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून (एससीईआरटी) ब्रीज कोर्सचा अभ्यासक्रम तयार केला आहे. शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ब्रीज कोर्सचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. दीड महिन्यांपासून विद्यार्थी शाळेला दुरावले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला ब्रीज कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे. ब्रीज कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे विषयनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. ऑनलाईन माध्यमातून अध्यापन सुरू झाले असले तरीही ब्रीज कोर्स शिकवावाच लागणार आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी तिसरीत असेल, तर ब्रीज कोर्स दुसरीच्या पाठ्यक्रमावर असणार आहे. शाळा बंद असून, ऑनलाईन शिक्षणामध्ये मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत. मात्र, पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही, असे महत्त्वाचे विषय ब्रीज कोर्समध्ये आहेत. प्रत्येक विषयाचा ब्रीज कोर्स स्वतंत्र असणार आहे. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार आहे. पंचेचाळीस दिवसांचा हा कोर्स विद्यार्थ्यांच्या उजळणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

चौकट :

संकल्पना स्पष्ट होण्यासाठी उपयुक्त

पुढील वर्गात प्रवेश करताना विद्यार्थ्याला मागील वर्षांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का हे तपासण्यासाठी ब्रीज कोर्सचा उपयोग होणार आहे. याबरोबरच संकल्पना अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रीज कोर्स मदत करणार आहे. सुरूवातीला शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यास स्तर चाचपण्याची सूचना करण्यात आली आहे.

विषयवार स्वतंत्र ब्रीज कोर्स

ब्रीज कोर्स शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त झाल्या आहेत की नाहीत, हेही शिक्षकांना पाहावे लागणार आहे. ब्रीज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी सक्तीचा असणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रीज कोर्स शिकवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मराठी, गणित, सामाजिकशास्त्र अशा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ब्रीज कोर्स असणार आहे.

आठवडाभरात कोर्सचे नियोजन

ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही. गेली दीड वर्षे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान व त्यामुळे तयार झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ब्रीज कोर्स मैलाचा दगड ठरणार आहे. येत्या आठवडाभरातच ब्रीज कोर्सचे अध्यापन सुरू होणार आहे.

कोट :

ऑनलाईन अध्यापनातील पोकळी भरून काढण्यासाठी ब्रीज कोर्स नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे लोटले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होताच ब्रीज कोर्सचे अध्यापन करावे लागणार, हे अभिप्रेत होते. मात्र, उशीर झाला आहे. ब्रीज कोर्समुळे मुलांच्या ज्ञानकोषाला नक्कीच उजाळा मिळणार आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा