शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

Satara: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला २० वर्ष कारावास, दीड लाख रुपये दंडाची शिक्षा

By दीपक शिंदे | Updated: July 31, 2024 12:18 IST

कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

कऱ्हाड : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला वीस वर्ष कारावास आणि दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा सुनावली.रोहित रमेश थोरात असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पाटण तालुक्यातील एका गावात २०२२ मध्ये ही घटना घडली होती. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२२ रोजी साडेपंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. ती शाळेत गेली होती. मात्र, ती शाळेतून घरी परत न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. यावेळी ती न सापडल्याने तिला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर याबाबत कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना तपासात रोहित थोरात याच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो बारामती भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली.रोहित थोरात याने संबंधित पीडित मुलीसोबत मैत्री करून तिला पळवून नेल्याचे पोलिस तपासातून समोर आले. पीडित मुलीच्या गळ्यातील सोन्याची चेन ज्वेलर्सच्या दुकानात विकून ते पुणे येथे गेले होते. त्यानंतर सासवड येथे पोलिसांनी त्यांना पकडले. त्यावेळी रोहित थोरात याच्याविरोधात बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह अन्य गुन्हे दाखल झाले होते.या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती.खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. आर. सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. शिक्षेवरील युक्तिवादासह तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एम. एस. तलबार, ज्वेलर्स दुकान मालक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. होरे यांनी रोहित थोरात याला या गुन्ह्यात दोषी धरून वेगवेगळ्या कलमांद्वारे २० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतून ७५ हजारांची नुकसानभरपाई पीडित मुलीला देण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय