शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

निसराळेत आज कारभारी करणार घरचा स्वयंपाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:46 IST

आजच्या महिला दिनी आपल्या गावामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांत कारभारणीला उत्स्फूर्तपणे सहभागी होता यावे, यासाठी घरच्या कारभाऱ्यांनी त्यांना चक्क सुट्टी द्यायची ठरवली आहे.

- नितीन काळेल सातारा : आजच्या महिला दिनी आपल्या गावामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांत कारभारणीला उत्स्फूर्तपणे सहभागी होता यावे, यासाठी घरच्या कारभाऱ्यांनी त्यांना चक्क सुट्टी द्यायची ठरवली आहे. सकाळच्या स्वयंपाकासह दिवसभर घरातील कामे पुरुषांनी करावयाची तसेच रात्री सामूहिक गावजेवण करायचे असा निर्णय त्यांनी घेतलाय. विशेष म्हणजे, यासाठी ग्रामसभेत तसा ठरावही संमत झाला आहे.साताºयाजवळील निसराळे येथे महिला दिन अशा अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. जकातवाडी (ता. सातारा) येथील यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ सोशल वर्क या महाविद्यालयाने निसराळे हे गाव दत्तक घेतले आहे. याच विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची संकल्पना मांडली. सर्व गावकऱ्यांनी त्याला आनंदाने संमती दर्शवली.निसराळे गावात महिलांसाठी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे दिवसभर घरचे कोणतेच काम करावे लागणार नसल्याने महिला अगदी निवांतपणे त्यात सहभागी होतील. निसराळेच्या सरपंच रूपाली कांबळे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ५सदस्या महिला आहेत. गावातील विकासकामांमध्ये त्या सहभागी होतात. आमच्या गावात समाजकार्य महाविद्यालयातर्फे वेळोवेळी अनेक उपक्रम राबविले जातात आणि त्यात महिलांचा सहभाग मोठा असतो.उपसरपंच अंकुश घोरपडे यांनी सांगितले की, रोजच्या घरकामाच्या ओढाताणीतून महिलांना थोडीशी उसंत मिळावी, याकरिता ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनी सर्व गावातील सर्व महिला त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अर्थात संध्याकाळच्या सामूहिक भोजनातील स्वयंपाकाला मेनू काय असणार, हे स्पष्ट झालेले नाही. तसेच दिवसभर स्वयंपाकघर सांभाळण्याचा शब्द कारभारी किती खरा करणार, याची उत्सुकता आहे. त्यामुळे एका लहान गावात होणाºया महिला दिनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.>गावात ३२६ कुटुंबेनिसराळे गावात ३२६ कुटुंबे राहत आहेत. तर गावाची लोकसंख्या १६०० च्या आसपास आहे.निसराळे ग्रामपंचायतीची आणि सोसायटीची निवडणूकही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे गावात एकीचे वातावरण असते.>ध्वनिक्षेपकावरून गावात जागृतीमहिला दिनी होणाºया या कार्यक्रमाची दवंडीदेखील देण्यात आली आहे. त्यामध्येही दिवसभर पुरुषांनाच घर सांभाळायचे आहे, असे सर्वांना ठणकावण्यात आले आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिला