शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अभय जगतापांचे बंड थंड; माढ्यात राष्ट्रवादीचा तिढा सुटला 

By नितीन काळेल | Updated: April 19, 2024 22:45 IST

साताऱ्यात भूमिका जाहीर : शरद पवार यांना संकटात सोडणार नाही.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून इच्छुक अभयसिंह जगताप यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपले बंड मागे घेतले आहे. यामुळे राष्ट्रवादीचा माढ्याचा तिढा सुटला आहे. तसेच शरद पवार यांना संकटाच्या काळात सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी माढा मतदारसंघाबाबत भूमिका जाहीर केली. यावेळी संजय जगताप, विजय जगताप, किरण खवळे, अमर जगताप आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटातून उमेदवारी मिळेल म्हणून तीन महिन्यांपासून पूर्ण तयारी केली होती. यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. पण, भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून माढ्याची उमेदवारी मिळवली. त्यामुळे जगताप नाराज झाले होते. त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन बंडाचा झेंडा उभारला. पण, शरद पवार यांनी त्यांना भेटीस बोलावल्यानंतर दोघांत मतदारसंघ उमेदवारी तसेच विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावेळी जगताप यांनी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. तसेच जगताप यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबरही बैठक झाली. त्यानंतर जगताप यांनी साताऱ्यात माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. राष्ट्रवादीबरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते यांच्यासमोरील संकट दूर झाले आहे. माढा मतदारसंघातही पक्षासाठी मोठे कष्ट घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल असे वाटले होते. मात्र, मोहिते-पाटील यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर माझ्यासह कार्यकर्ते नाराज होते. यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यकर्त्यांतून मागणी होती. पण, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाल्यानंतर निर्णय बदलला.

- अभयसिंह जगताप, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस

टॅग्स :madha-pcमाढाSharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४