शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

अबब.. मतदारांची ‘भाऊ’गर्दी

By admin | Updated: October 16, 2014 00:10 IST

पाटण : म्हसवड : वरकुटे-मलवडीत तणाव¿f¿fशाब्दिक चकमक

माण-खटाव मतदारसंघात यावेळी कधी नव्हे एवढी चुरस असल्याने निकालाकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. आमदार जयकुमार गोरे यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे शेखर गोरे रिंगणात उतरले. ज्येष्ठ नेते सदाशिवराव पोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आखाड्यात प्रवेश केला, तर राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्याने अनिल देसाईही लढतीत प्रवेशकर्ते झाले. खटावमधील नेते रणजितसिंह देशमुख यांनी शिवसेनेकडून या संग्रामात उडी घेतल्याने निवडणूक बहुरंगी झाली. युती आणि आघाडी तुटण्यापूर्वीच मैदानात उतरण्याचा निर्णय यापैकी बहुतेक सर्वांनी घेतला होता. वरिष्ठ पातळीवर युती-आघाडीचा निर्णय झाल्यानंतर अनेकांचे पक्ष आणि चिन्हे ठरली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीपासूनच सर्वांनीच प्रचारयंत्रणा जोरदारपणे राबविली असल्याने या मतदारसंघात जोरदार चुरस आहे.म्हसवड : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघासाठी ३ लाख ९ हजार ४४२ पैकी १ लाख ९२ हजार ४१३ उमेदवारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.मतदानाच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. यामध्ये वृद्ध, अपंगांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले. माण मतदारसंघात ३५४ मतदानकेंद्रे स्थापन करण्यात आली होती. या केंद्रांमध्ये १ हजार ७७० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. याखेरीज ४१ झोनल अधिकारी व त्यांच्यासोबत फिरते कर्मचारी तैनात करण्यात आले होते. माण मतदारसंघात मायणी, वडूज, मार्डी, म्हसवड व गोंदवले येथील दहा मतदानकेंद्रे अतिसंवेदनशील म्हणून प्रशासनाने जाहीर केली होती.माण मतदारसंघात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोन पोलीस उपअधीक्षक, एक प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक, एक पोलीस निरीक्षक, सात सहायक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, चार प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, मुंबई पोलीस दलाचे २८० कर्मचारी, ९९ गृहरक्षक, तसेच गुजरात केंद्रीय निमलष्करी दलाची ९० जवानांची एक कंपनी आणि पंजाब पोलिसांची ८० जवानांची एक कंपनी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माण मतदारसंघात ३ लाख ९ हजार ४४१ मतदार असून, १ लाख ६० हजार ३१३ पुरुष तर १ लाख ४९ हजार १२८ स्त्री मतदार आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ९२ हजार ४१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९९ हजार ३६८ पुरुष आणि ९३ हजार ४५ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२.१८ होती. निवडणूक यंत्रणेने मतदान केंद्रासमोर निवारा (मंडप) उभारल्याने मतदारांना उन्हाचा त्रास झाला नाही. पाच वाजेपर्यंत मतदारसंघात शांततेत मतदान झाले. प्रचंड चुरस असलेल्या या मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांचे लक्ष आता १९ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. (प्रतिनिधी)म्हसवड : वरकुटे-मलवडीत तणाववरकुटे-मलवडी : शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या मतदाराचे आक्षेपार्ह मतदान केल्याच्या आरोपामुळे वरकुटे-मलवडी येथील मतदान केंद्र क्र. १७४ वर वाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण पसरले. मतदान केंद्राजवळ असलेल्या विविध उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींमध्ये वादावादी झाली. त्यामुळे सभोवताली असणाऱ्या लोकांनी मतदान केंद्राकडे धाव घेतली आणि गोंधळ निर्माण झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. दरम्यान, मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी आलेले आमदार जयकुमार गोरे त्या ठिकाणी उपस्थित असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली. म्हसवड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. एम. कोरे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगविले. तसेच पोलीस बंदोबस्तात वाढ केली. त्यानंतर सायंकाळी सहापर्यंत शांततेत मतदान झाले. दिवसअखेर वरकुटे-मलवडीत ६५.४३ टक्के मतदानाची नोंद झाली.देसाई-पाटणकर गटात बाचाबाचीपाटण : पाटण विधानसभा मतदारसंघातील ३९९ मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान पार पाडले. किरकोळ बाचाबाची प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. भुडकेवाडी (तारळे) मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असताना सकाळी साडेअकरा वाजता कृष्णात मोरे या मतदाराने मतदान केल्यानंतर ‘माझ्या मुलाचे नाव मतदार यादीत घालून माझी प्रॉपर्टी लुटताय,’ असा आरोप करून मतदानयंत्र उचलून आपटले. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. कृष्णात मोरे याच्यावर उंब्रज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक केली. दरम्यान, अर्ध्या तासानंतर मतदानप्रक्रिया सुरळीत करण्यात आली. दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख अभिनव देशमुख यांनी भेट दिली.बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाटणच्या ३९९ मतदान केंद्रावर ६३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जाधव यांनी दिली. ५ वाजेपर्यंत १७७०५० एकूण मतदान झाले. त्यापैकी ८८७२९ पुरुष व ८८३२१ स्त्री मतदार आहेत. मतदान वेळसंपेपर्यंत सरासरी ६८ टक्के मतदान होईल, असे सांगण्यात आले. दिवसभरात कोठेही मतदानयंत्रे बंद पडण्याचा प्रकार झाला नाही. निवडणूक निरीक्षक श्रीनिवासन यांनी दिवसभरात कोकिसरे, काळोली, मोरगिरी, पाटण आदी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सकाळी ७ वाजल्यानंतर मतदान प्रक्रिया वेगाने सुरू झाली. दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर तुरळक मतदार दिसले. त्यानंतर दुर्गम भागातील अनेक मतदान केंद्रे ओस पडली होती. खरीप पिकांचा काढणी हंगाम सुरू असल्यामुळे तालुक्यातील स्त्री मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. प्रत्येक गावांतील बाहेरील मतदार लक्झरी बसेसने मुंबई-पुण्याहून आले होते. जमदाडवाडी येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रे बंद पडले होते. ते तत्काळ सुरू करण्यात आले.दुर्गम भागातील छोट्या मतदारसंख्याची केंद्रे दुपारनंतर ओस पडली. दुपारी दोन वाजेपर्यंत कोयना विभागातील दुर्गम भागातील मतदान केंद्रावर पुढीलप्रमाणे मतदान झाले. किल्ले मोरगिरी- ३६८, कोंडावळे - ४२७, झाकडे- २९०, गोवारे- २९९, मणेरी- ५८४, काडोली- ५४८, हेळवाक- ६१७ असे मतदान झाले होते. तळोशी, चाफ्याचा खडक, कुसवडे, लेंडोरी, तळीये, पूर्व-पश्चिम, मिरगाव-चिरंबे आदी गावांतील मतदारांना आजही चार किलोमीटर चालत जाऊन मतदान केंद्रावर पोहोचावे लागते. आजही अशी पायपीट करावी लागली. (प्रतिनिधी)बोगस मतदानाच्या तक्रारीवरून उमेदवार प्रतिनिधींत वादगोडोली मतदान केंद्रावरील प्रकार : संबंधित मतदार मात्र झाला गायबसातारा : सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील गोडोली येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान पकडून दिल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी शिवसेनेचे उमेदवार दगडू सकपाळ यांचे प्रतिनिधी किशोर धुमाळ यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि किशोर धुमाळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकही झाली. धुमाळ यांच्यावरही राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर धुमाळ मतदान केंद्रातून बाहेर पडले. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी विविध मतदान केंद्रांवर मतदान झाले. गोडोली येथील शाळेतील प्रत्येक मतदान केंद्रात प्रत्येक उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत. मतदारांची ओळख पटवणे तसेच बोगस मतदान होऊ नये म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली असते. गोडोली मतदान केंद्रावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप उमेदवारांचे प्रतिनिधी होते.येथे मतदानाच्या पार्श्वभूमीवर उमेदवार प्रतिनिधींच्यात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार सुरूच होते. मात्र, दुपारी चार वाजता एक मतदार येथे आला होता. किशोर धुमाळ यांनी मतदान केंद्र क्रमांक २८0 मध्ये जाऊन त्याच्याकडे ओळख मागितली असता, तो उमेदवार समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. यानंतर येथे जोरदार शाब्दिक चकमक झाली. ‘तो’ मतदार मात्र गायबकिशारे धुमाळांनी बोगस मतदान पकडून दिल्यानंतरही पोलिसांनी येथे बघ्याची भूमिका घेतली. ते पोलिसांकडे तक्रार करत असतानाच एक वयोवृद्ध ‘किशोर, जाऊ दे लहान आहे तो. त्याचे मतदान नाही. तो सहज पाहायला आला आहे. त्याला सोडून दे. उगाच विषय वाढवू नको,’ असे सांगत होते. मात्र, धुमाळ ऐकायला तयार नव्हते. संबंधित युवकाला त्यांनी पकडून धरले होते. युवकही चांगलाच घाबरला होता. अखेर येथे दत्ता बनकर, गणेश निकम, अनिल महिपाल आले आणि धुमाळांशी वाद घालायला सुरुवात केली. नेमकी हीच संधी साधून बोगस मतदान करायला आलेला युवकही येथून पळून गेला. यानंतर मात्र तो कोण होता, त्याचे नाव काय याविषयी कोणीही बोलायला तयार नव्हते. दरम्यान, या घटनेनंतर येथे तणावपूर्ण वातावरण झाले होते. या भागात निर्माण झालेल्या तणावाची दिवसभर शहरात अनेक ठिकाणी चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)गाडीत घेतले अन् खाली उतरलेगोडोली मतदान केंद्रावर बोगस मतदान करणाऱ्यास पकडले असतानाच गोंधळ सुरू झाला. धुमाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक स्वराज पाटील यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला आणि त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत शिवसेना जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत जाधव आणि राजेंद्र चोरगे येथे आले. दरम्यान, येथील गोंधळ केंद्राबाहेर येऊन थांबला होता. पोलीसही येथे आले त्यांनी किशोर धुमाळ आणि अनिल महिपाल यांना गाडीत घातले. काहीवेळ दोघे गाडीतच होते. यानंतर पोलीस उपनिरीक्षक स्वराज पाटील खाली उतरून आढावा घेत होते. याचवेळी जाधव यांनी पाटील यांना थोडे लक्ष देण्याची विनंती केली. पाटील यांनीही त्यास होकार दिला आणि घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर ते गाडीत बसले आणि धुमाळ तसेच महिपाल खाली उतरले. शंभूराज देसार्इंबरोबर पाटणमध्ये शाब्दिक चकमकशिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी पाटण शहरातील मतदान केंद्रांना बराच काळ भेटी दिल्या. दरम्यान, पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांसमवेत देसार्इंची बाचाबाची झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतरही शंभूराज यांनी पाटणमधील मतदान केंद्राना भेटी दिल्या. त्यामुळे लायब्ररी चौक येथे मोठा जमाव जमला होता. पोलीस बंदोबस्तदेखील तैनात होता.कोयना धरणापलीकडील झाडोली मतदान केंद्र कोयनानगर येथे होते. मात्र, या गावचे पुनर्वसन कऱ्हाड तालुक्यातील बाबरमाची येथे झाले आहे. त्यामुळे पुनर्वसन झालेल्या गावकऱ्यांनी कोयनेत येऊन मतदान केले व केंद्र चालविले. याठिकाणी ४७१ मतदान होते. त्यापैकी २५९ मतदान झाले.भरारी पथकाचा झाडाखाली आरामजाईचीवाडी येथे राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू असताना पोलीस व झोनल आॅफिसर यांचे एक पथक तिकडे जात असताना वाटतेच गाडी लावून झोपल्याचे अनेकांनी पाहिले.पाटणचे आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटणमध्ये, उमेदवार सत्यजित यांनी पाटणमध्ये तर शंभूराज देसाई यांनी मरळीत मतदान केले.पाटण मतदारसंघात १५ उमेदवार होते. मात्र, एक-दोन उमेदवारांचे मतदान प्रतिनिधीच गावागावांतील केंद्रावर होते. अन्य उमेदवारांचे प्रतिनिधी दिसले नाहीत.