शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात ट्रकच्या चाकाखाली सापडून तरूणी ठार

By दत्ता यादव | Updated: December 3, 2023 14:08 IST

रविवारी सकाळी ती दुचाकीवरून साताऱ्याकडे यायला निघाली

सातारा: सातारा-कोरेगाव रस्त्यावर संगम माहुलीजवळ ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. दिशा उदय घोरपडे (वय १९, मूळ रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या रा. सदर बझार सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरूणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिशा घोरपडे ही शनिवारी सोनगाव, ता. सातारा येथे मामाकडे गेली होती.

रविवारी सकाळी ती दुचाकीवरून साताऱ्याकडे यायला निघाली. संगम माहुलीजवळ आल्यानंतर ट्रकला ओव्हरटेक करून ती पुढे गेली. मात्र, तिची दुचाकी अचानक घसरल्याने ती ट्रकखाली सापडली. त्यामुळे ट्रकचे पुढील चाक तिच्या डोक्यावरून गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाचे चित्र विदारक होते. छिनविच्छिंन्न मेंदू आणि रक्ताचा सडा पडला होता. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार कारळे व हवालदार धनाजी यादव हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. या अपघामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी त्यांनी पूर्ववत केली. मृत तरूणीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.

या अपघाताची माहिती मृत दिशा घोरपडे हिच्या आई-वडिलांना समजल्यानंतर दोघेही सिव्हिलमध्ये आले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांनी केलेला आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारा होता. दिशा ही साताऱ्यातील यशोदा शिक्षण संस्थेमध्ये फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील शिक्षक असून, तिला एक बहीण आहे. या अपघाताची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दुभाजकाने घेतला ‘तिचा’ बळी

कोरेगाव-सातारा रस्त्याचे गेल्या अनेक दिवसांपासून सिमेंट काॅंक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. बाॅम्बे रेस्टाॅरंट ते संगम माहुलीपर्यंत काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. मात्र, दुभाजकाचे काम अर्धवट आहे. सिमेंटचा रस्ता झाल्यामुळे त्याची उंची वाढली. वाहन खाली उतरताना स्लोप न ठेवल्यामुळे वाहनांचा अपघात होत आहे. दिशा घोरपडे हिचाही अशाच प्रकारे अपघात झाला असल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला. संबंधित ठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात