शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कऱ्हाड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:50 IST

घटनेनंतर तर्क-वितर्कांना उधाण

मलकापूर : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय युवतीचा आगाशिवनगर मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. योगेश्वरी निटुरे (वय २२), असे इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी राज्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांसह देश-परदेशातील विद्यार्थी दरवर्षी येत असतात. अशाच एका वैद्यकीय महाविद्यालयात परजिल्ह्यांतील एक २२ वर्षीय युवती शिक्षण घेत होती. ती आगाशिवनगर मलकापूर येथील एका इमारतीत वास्तव्यास होती, अशी घटनास्थळी चर्चा होती. याच इमारतीवरून संबंधित युवती रविवारी सकाळी आठच्या सुमारास पडल्याने गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात असून, अधिकृत माहिती सोमवारी रात्री उशिरापर्यंत समोर आली नव्हती. त्यामुळे या घटनेबाबतचा संभ्रम रात्री उशिरापर्यंत कायम होता.

बड्या असामीमुळे गुप्तता?या दुर्दैवी घटनेनंतर परजिल्ह्यातील एका मोठ्या व्यक्तीची मुलगी असल्याची चर्चा सोमवारी सुरू होती. त्यामुळेच पोलिसांकडून सखोलपणे या प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व शक्यता लक्षात घेत चौकशी केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र अधिकृत माहिती समोर न आल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.