शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दुर्देवी! कावड करुन नेला मृतदेह, मृतदेह घेऊन जाणाऱ्यांची जंगलातून पायपीट!, पिसाडी गावातील ग्रामस्थ भोगतायत मरणयातना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:41 IST

एकविसाव्या शतकातही अजून अनेक वाड्या वस्त्यांमध्ये आहे अशी विदारक परिस्थिती

सागर चव्हाणपेट्री: कास पठार परिसरातील अतिदुर्गम पिसाडी (ता. जावळी) गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून तो मृतदेह काठीला बांधून त्याची अक्षरशः कावड करत कित्येक मैल जंगलातून पायपीट करत मूळगावी पिसाडीला न्यावा लागला. रस्त्याअभावी मैलोनमैल पायपीट सुरू असून, अनेकविध समस्यांशी संघर्ष करत ग्रामस्थ खडतर आयुष्य जगत असून, गावापर्यंत रस्ता पोहोचावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.मृत जाईबाई तुकाराम मरागजे (वय ८०, पिसाडी) या उपचारासाठी आपल्या मुलीच्या गावी आल्या होत्या. याच गावी वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह मूळगावी पिसाडी (कारगाव) येथे घेऊन जाताना हा सर्व खटाटोप करावा लागला.पिसाडी गावाला रस्ता मार्गाने जाण्यासाठी अंधारी-कास-जुंगटी ते कात्रेवाडी असा रस्ता आहे; पण कात्रेवाडीतून तीन किलोमीटरवर असलेल्या पिसाडी गावाला तेथून पुढे रस्ता नाही. त्यामुळे गावातील लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मूलभूत गरजा भागविण्यासाठी ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याअभावी या गावातील वयोवृद्ध, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर परवड होताना दिसत आहे. या गावचा सर्व भाग जंगलाने व्यापला असल्याने याठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे ग्रामस्थांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्याअभावी वाहतूक व दळणवळणासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने गावापर्यंत रस्ता पोहोचावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत...त्यामुळे गावांमध्ये सुविधा पुरवण्याबाबत दुर्लक्ष या गावातील काही लोकांचे येथून पुनर्वसन करावे, अशी मागणी आहे. तर काही लोकांना आपले मूळगाव सोडायचे नाही, असे समजते. त्यामुळे प्रशासनाची या गावांमध्ये नागरी सुविधा पुरवण्याबाबत दुर्लक्ष होताना दिसत आहे. एकविसाव्या शतकातही अजून अशी दृश्य पाहायला मिळत असल्याने याबाबत प्रशासकीय पातळीवर ग्रामस्थांच्या सोयीनुसार तोडगा काढणे गरजेचे आहे.

रस्त्याअभावी अनेक समस्येंशी संघर्ष!- पायवाटेच्या सर्वत्र झाडी व मोठ्या प्रमाणावरील गवतांमुळे बिबट्या, अस्वल, गवे या वन्य श्वापदांबरोबरच विषारी सर्पाची भीती.- आजारी व्यक्तीला उपचारासाठी व अत्यावश्यक सेवेसाठी मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी कावड, डालग्याचा वापर.- दळणवळण व मालाची डोक्यावरून वाहतूक करून दीड ते दोन तास डोंगर चढउतार पायी प्रवास

टॅग्स :Satara areaसातारा परिसर