शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील शहाबाग होणार हळदीचं गाव !, कृषी संचालकांकडे प्रस्ताव 

By नितीन काळेल | Updated: January 2, 2025 19:11 IST

हळद पदार्थांचा ब्रँड तयार होणार, शहाबागच का?

नितीन काळेलसातारा : सातारा जिल्ह्यात विविध प्रकारची गावे विकसित होत असून वाई तालुक्यातील शहाबागचा हळदीचे गाव म्हणून विकासासाठीचा तांत्रिक प्रस्ताव कृषी संचालकांकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर शहाबागचा हळद ब्रँड तयार होईल. तसेच यामुळे पर्यटन वाढून पर्यटकांसाठी निवास व्यवस्थाही होईल. लोकांनाही हळदीपासून तयार पदार्थांची खरेदी करता येणार आहे.सातारा जिल्ह्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. फळांचं गाव म्हणून धुमाळवाडी पुढे आली आहे. तसेच आता हळदीचं गाव म्हणून शहाबागवर मोहोर उमटणार आहे. शहाबाग हळदीचं गाव म्हणून विकसित करण्यासाठी निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो राज्य कृषी विभागाने तांत्रिक मंजुरीसाठी कृषी संचालकांकडे पाठवला. यामुळे शहाबागमध्येच हळदच्या पानापासून तेल उत्पादन होईल. साैंदर्य प्रसाधनात हळदचा वापर वाढेल. गोल्डन मिल्क पावडरची निर्मिती होईल. तसेच हळदपासून उपपदार्थांची निर्मिती होणार आहे.विशेष म्हणजे पर्यटक हळदपासून तयार पदार्थ जसे हळद पावडर, फ्लेक्स, तेल, साबण, शॅम्पू, उटणे, गोल्डन मिल्क आदी खरेदी करतील. यामुळे अर्थकारण वाढीस ही मदत होईल, असा हेतू यामागे आहे. सातारा जिल्ह्यात हळद क्षेत्र सुमारे १,५०० हेक्टर असून वाई, सातारा, कोरेगाव तालुक्यात याचे प्रमुख क्षेत्र आहे.

शहाबागच का?शहाबागमध्ये सुमारे १०० हेक्टरवर हळद पीक घेतले जाते. हे गाव पुणे-वाई-महाबळेश्वर मार्गावर आहे. याच रस्त्याने पर्यटक जातात. त्यातच शहाबागमध्ये हळद पावडर करण्याचे तीन मोठे उद्योग आहेत. त्यामुळे पर्यटकांचा प्रतिसाद मिळेल या हेतूने शहाबाग गावाने हळदीचे गाव जाहीर करण्याबाबत कृषी विभागाकडे प्रस्ताव दिला होता.

शहाबागचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर करण्यापूर्वी तांत्रिक मंजुरीसाठी कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाप्रमाणे काम झाल्यास शहाबागचा हळदच्या पर्यटनाचे गाव म्हणून विकास होईल. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर