शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजूर महिलेची ट्रॅक्टरमध्येच प्रसूती, साताऱ्यातील कऱ्हाडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 11:51 IST

१०८ रुग्णवाहिकेने बाळ अन् मातेचा जीव वाचविला

सातारा : ऊसतोड मजूर महिलांच्या हालआपेष्टांच्या अनेक घटना समोर येत असून, अशीच एक घटना कऱ्हाड परिसरात गुरुवारी सकाळी समोर आली. गरोदर असलेल्या ऊसतोड मजूर महिलेला धावत्या ट्रॅक्टरमध्येच प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. ही बाब १०८ रुग्णवाहिकेला मिळाल्यानंतर रुग्णवाहिकेतील महिला डाॅक्टर व परिचारिकांनी तातडीने तेथे जाऊन बाळ व मातेचा जीव वाचविला.लक्ष्मी गणेश एकावडे (वय ३०, रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) ही महिला ऊसतोड मजूर आहे. ही महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. पती गणेश एकावडेसह ती कऱ्हाडला दवाखान्यात तपासणीसाठी निघाली होती. वाटेत ट्रॅक्टर दिसल्याने त्यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून कऱ्हाडला जाण्याचा निर्णय घेतला. कऱ्हाड अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असतानाच धावत्या ट्रॅक्टरमध्येच त्या महिलेला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. वेदनेमुळे ती महिला व्याकूळ झाली. ट्रॅक्टर चालक प्रमोद जाधव यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर १०८ रुग्ण वाहिकेचे समन्वयक राजेंद्र कदम यांनी तातडीने कऱ्हाड येथे रुग्णवाहिका पाठविली. रुग्णवाहिकेतील महिला डाॅक्टर दीपाली पाटील यांनी तातडीने महिलेला ट्रॅक्टरमधून खाली घेतले. तोपर्यंत महिलेची नैसर्गिक प्रसूती होत आली होती. डाॅ. पाटील यांनी ट्रॅक्टरचा आडोसा करून अत्यंत सुरक्षित त्या महिलेची प्रसूती केली. त्यानंतर बाळ आणि मातेला सुखरूपपणे रुग्णालयात पोहोचवण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPregnancyप्रेग्नंसी