शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीच्या आरतीला बोलवा म्हणून गेला, अन्...; साताऱ्यात शाळकरी मुलाने संपवलं जीवन 

By दत्ता यादव | Updated: September 23, 2023 14:19 IST

कोंडवेतील घटनेने अनेकांची मने हेलावली

सातारा : क्लासवरून आल्यानंतर सहावीतल्या मुलाने शेजारच्या काकूंना ‘मला गणपतीच्या आरतीला बोलवा, तोपर्यंत मी जेवण करतो,' असं सांगून घरात गेला. तो अखेरचाच. जेवण झाल्यानंतर त्यानं किचनमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवल. या मुलाच्या आत्महत्येने अनेकांची मने अक्षरश: हेलावून गेली. ही ह्दयद्रावक घटना सातारा शहराजवळील कोंडवे येथे शुक्रवार, दि. २२ रोजी घडली.सुशांत नीलेश कांबळे (वय १२) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुशांत हा शाहूपुरीतील एका शाळेत सहावीमध्ये शिकत होता. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता तो क्लासवरून घरी आला. त्यावेळी त्याची आई आणि वडील कामावर गेले होते. घराची एक चावी त्याच्याजवळ होती. दरवाजा उघडून तो घरात गेला. तत्पूर्वी त्याने शेजारील काकूंना ‘मला गणपतीच्या आरतीला बोलवा. तोपर्यंत मी जेवण करतो,’ असे सांगितले. सकाळी साडेअकरापर्यंत घरात तो एकटाच जेवला. त्यानंतर त्याने किचनमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेतला. दरम्यान, बराचवेळ तो घरातून बाहेर आला नाही म्हणून त्याचे मित्र त्याला बघायला घरात गेले. त्यावेळी तो त्यांना लटकलेला दिसला. हे पाहताच मुलांनी आरडाओरड केली. काहींनी सुशांतच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. सातारा तालुका पोलिस आणि त्याचे आई-वडीलही तातडीने घटनास्थळी आले. त्याच्या गळ्याचा फास काढून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.सुशांतची आई धुणीभांडीचे तर वडील गवंडी काम करत आहेत. हे दोघे रोज सकाळी घराबाहेर पडतात. नेहमीप्रमाणे सुंशातही क्लासला जात होता. घरात कसलाही वाद झाला नाही. असे असताना त्याने कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, या विचाराने त्याच्या घरातल्यांना अस्वस्थ करून सोडलं आहे. शाळेत किंवा गावात त्याची कोणासोबत भांडणे झाली होती का, त्याला कोणी रागवले का, याचा आता पोलिस तपास करत आहेत. योगेश पोपट कांबळे (वय ३७, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली असून, पोलिस नाईक प्रवीण वायदंडे हे अधिक तपास करीत आहेत.

खेळता-खेळता तर हे घडलं नसेल..सुशांतचे जेवण झाल्यानंतर मुलांसमवेत खेळता-खेळता तर त्याने फास घेतला नसेल ना, अशी शंकाही त्याच्या कुटुंबातील काहींना येत आहे. मुले खेळत होती. तो अगदी आनंदात होता. दोरीचा खेळ खेळताना त्याच्या हातून चुकून गळफास लागला तर नाही ना, याचा सुद्धा आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर