शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: हनी ट्रॅपमध्ये अडकले चक्क सेवानिवृत्त नायब तहसीलदार!, ‘ती’ने चौघांना सोबत घेऊन रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:16 IST

आणखी कोणाला जाळ्यात ओढले का?

सातारा : चार दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या हनी ट्रॅपच्या प्रकरणात एक-एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. ते ७१ वर्षांचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार, तर ती ४५ वर्षांची गृहिणी. नायब तहसीलदारांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यासाठी तिने चाैघा तरुणांना सोबत घेऊन जबरी चोरीचा बनाव केला. मात्र, सातारा शहर पोलिसांनी तिचा बनाव उघड करून तिच्यासह पाच जणांना बेड्या ठोकल्या.नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झालेले ७१ वर्षीय गृहस्थ साताऱ्यात आपल्या कुटुंबासह वास्तव्य करत आहेत. एके दिवशी त्यांची ओळख ४५ वर्षीय महिलेसोबत झाली. त्या महिलेने त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून त्यांना जाळ्यात ओढले. ती महिला सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांच्या घरात कोणी नसताना गेली. तिथे गेल्यानंतर तिने तिच्या साथीदारांना सेवानिवृत्त नायब तहसीलदारांची नजर चुकवून फोन केला. ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे चार जण त्यांच्या घरात आले.त्यातील एका व्यक्तीने तुमच्याजवळचे सोने काढून द्या, असे म्हणत मोबाइलवर शूटिंग करण्यास सुरुवात केली. तुम्ही अश्लील चाळे करत बसलाय. तुमचे फोटो व व्हिडीओ शूटिंग केले आहे. हे सर्व व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून गेलेल्या त्या सेवानिवृत्त नायब तहसीलदारांनी सोन्याची चेन, हातातील दोन अंगठ्या, असा सुमारे २ लाख ७० हजारांचा ऐवज काढून दिला. एवढेच नव्हे, तर त्या महिलेनेही स्वत:च्या गळ्यातील दागिने त्यांच्यावर काढून दिले.जेणेकरून आपली शंका येऊ नये, याची तिने खबरदारी घेतली होती. कारण, या प्रकरणातील करता करविता तीच होती, हे पुढे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर सातारा शहर पोलिसांनी तिच्यासह तिच्या चार साथीदारांना अटक केली. यापूर्वी घडलेल्या अनेक हनी ट्रॅपच्या प्रकरणांत ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळले गेले. परंतु हे हनी ट्रॅपचे प्रकरण जरा वेगळेच असल्याचे पोलिस सांगताहेत.आणखी कोणाला जाळ्यात ओढले का?संबंधित महिलेने चार जणांना सोबत घेऊन आणखी कोणाला अशाप्रकारे हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले आहे का, याची माहिती घेण्यासाठी पोलिस संबंधितांकडे कसून चाैकशी करीत आहेत. या गुन्ह्यातील रिकव्हरी बाकी असल्यामुळे आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर केली नाहीत. त्यांची नावे सोमवारी जाहीर केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.