शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाची किमया; साताऱ्यात दुर्मीळ ‘श्वेत शाही बुलबुल’चे दर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:01 IST

निसर्गप्रेमींसाठी हा बुलबुल कुतूहलाचा विषय ठरला

सातारा : समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात एका दुर्मीळ, संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या शाही बुलबुलची नोंद करण्यात आली आहे. पक्षी अभ्यासक सागर कुलकर्णी आणि आकाश राऊत यांनी या बुलबुलची नोंद केली असून, निसर्गप्रेमींसाठी हा बुलबुल कुतूहलाचा विषय ठरला आहे.हा पक्षी त्याच्या सामान्य लाल आणि काळ्या रंगाच्या थव्यामध्ये आपले वेगळेपण मिरवत आहे. तो पांढरा असण्याचे कारण म्हणजे त्याच्या शरीरात ‘ल्यूसिजम’ नावाच्या स्थितीत बदल होणे. सामान्यतः पक्ष्यांच्या त्वचेमध्ये आणि पिसांमध्ये मेलेनिन नावाचे रंगद्रव्य असते, ज्यामुळे त्यांना त्यांचा विशिष्ट रंग मिळतो. मात्र, जनुकांमधील बिघाडामुळे जेव्हा या रंगद्रव्याची निर्मिती थांबते, तेव्हा पक्ष्याची पिसे संपूर्णपणे पांढरी होतात. हा बुलबुल त्याच स्थितीचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या पंखांचा प्रत्येक भाग शुभ्र पांढरा आहे.सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा, घनदाट जंगल आणि वनसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. इथला पोषक अधिवास अनेक दुर्मीळ आणि विविध प्रजातींच्या पशुपक्ष्यांसाठी नंदनवन ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून अभ्यासकांनी या परिसरात अनेक दुर्मीळ नोंदी केल्या आहेत, ज्यामुळे साताऱ्याचे पर्यावरणीय महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

ही पहिलीच घटना सातारा जिल्ह्यात आजवर अनेक दुर्मीळ पशू-पक्ष्यांची नोंद झाली आहे. मात्र, पांढऱ्या रंगाचा ‘श्वेत शाही बुलबुल’ आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नोंदीमुळे साताऱ्याच्या निसर्गातील अमूल्य ठेवा किती मोठा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. साताऱ्यातील पक्षी अभ्यासकांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणामुळेच या पक्षाचे दुर्मीळ दर्शन घडले आहे.

सातारा जिल्ह्याला समृद्ध वनसंपदा लाभली असून येथे अनेक पशुपक्षी अधिवास करतात. निरीक्षणावेळी प्रथमच पांढऱ्या रंगाचा श्वेत शाही बुलबुल आढळून आला. साताऱ्याच्या दृष्टीने ही अत्यंत दुर्मिळ अशी घटना म्हणावी लागेल. - सागर कुलकर्णी, पक्षी अभ्यासक