शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नफा कमावण्याचं आमिष दाखवलं, साताऱ्यातील एका पोलिसाने सहकाऱ्यांपासून आयटी इंजिनिअरपर्यंत सगळ्यांनाच गंडवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:15 IST

ड्यूटीवर हजर न राहता पसार; आयटी इंजिनिअरपासून पोलिसही फसले

सातारा : अंगात खाकी वर्दी असल्यामुळे त्याला कायद्याचे सर्व ज्ञान; पण याच कायद्याचा दुरुपयोग करून त्याने आपल्याच सहकाऱ्यांना गळ घालून नफा कमावण्याचं आमिष दाखवलं. प्लाॅट देतो, असे सांगून त्यानं पोलिस दलातील सहकाऱ्यांपासून आयटी इंजिनिअरपर्यंत सगळ्यांनाच गंडवलं. फसवणुकीची रक्कम डोईजड झाल्यानंतर त्याला ड्यूटीवर हजर न राहता मात्र परागंदा व्हावं लागलं. ही कहाणी आहे एका पोलिस काॅन्स्टेबलची.सागर भुजबळ असं या पोलिस काॅन्स्टेबलचं नाव. खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेला सागर पोलिस दलात भरती झाल्यानंतर तो साताऱ्यातील पोलिस प्रबोधनीमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाला. तो खेळाडू घडवत असताना दुसरीकडे मात्र त्याचे भलतेच उद्योग सुरू झाले. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो, असे तो आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना सांगू लागला.प्लाॅट खरेदीत झटपट पैसा मिळतोय, हे तो पटवून देऊ लागला. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून पोलिस दलातील काही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला लाखोत पैसे दिले. जमीन व्यवहार खरा वाटावा म्हणून त्यानं दस्त, नोंदी सारी कागदपत्रे बनावट बनवली. एक-एक सावज हेरत तो पैसे उकळत गेला. अगदी आयटी इंजिनिअर, नोकरदार, सैन्य दलातील जवानाचे कुटुंब अशा सगळ्यांकडून त्याने पैसे उकळले; पण जेव्हा या गुंंतवणूकदारांकडून तगादा सुरू झाला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन हादरली. एकीकडे नोकरीचे टेन्शन, तर दुसरीकडे बदनामी. या कसरतीत त्याने वडिलोपार्जित जमीनही देतो म्हणून आयटीआयचे क्लार्क धैर्यशील देशमुख यांना २५ लाखांना गंडा घातला. याच तक्रारीचा पहिला गुन्हा काॅन्स्टेबल सागर भुजबळवर दाखल झाला. त्यानंतर मात्र, त्याचे कारनामे आणखी समोर आल्यानंतर सारेच हादरले. कोणाकडून १० लाख, तर कोणाकडून १८ लाख, तर कोणाकडून ९ लाख, अशी रक्कम घेतल्याचा त्याच्यावर आरोप होत असून, सर्व कागदपत्रे घेऊन तक्रारदार पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत आहेत.म्हणे, अंगातील वर्दीमुळे तो फसविणार नाही, याची खात्रीकधी तो जमीन व्यवहारात पैसे गुंतविण्यास सांगायचा, तर कधी शाळांसाठी लागणाऱ्या बॅगच्या कोट्यवधी रुपयांच्या टेंडरमधून नफा मिळवून देण्याचे आश्वासन द्यायचा. अंगात वर्दी असल्यामुळे तो फसविणार नाही, याची खात्री सगळ्यांनाच म्हणे होती; पण जेव्हा त्याचे फसवणुकीचे आकडे समोर आले तेव्हा सारेच अवाक् झाले. आपल्याच सहकाऱ्याविरोधात तक्रार देण्याची वेळ पोलिसांवर आली.या प्रकरणाची पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दखल घेतल्यामुळेच काॅन्स्टेबल सागर भुजबळवर पहिला गुन्हा दाखल झाला. आता तक्रारदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अधीक्षकांनी यामध्ये लक्ष घालून फसलेल्या पोलिसांना व इतर नागरिकांना न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा पीडित तक्रारदारांची आहे.यांची झाली फसवणूकधैर्यशील देशमुख २५, महाबळेश्वर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल प्रवीण जाधव ९ लाख ६० हजार, अन्य एक पोलिस कर्मचारी १५ लाख, जवानाची पत्नी १० लाख, आयटी इंजिनिअर मयूर कणसे १८ लाख, एक व्यावसायिक १.५० लाख, अशी फसवणुकीची रक्कम आहे. हा फसवणुकीचा आकडा आणखी वाढू शकतो, असे पोलिस सांगताहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Police Constable Scams Colleagues, IT Engineer with False Profit Promises

Web Summary : A Satara police constable, Sagar Bhujbal, allegedly defrauded colleagues and others, promising quick profits from land deals. He used fake documents to swindle money from IT professionals, soldiers' families, and fellow officers. Facing pressure from investors, he absconded after a complaint was filed against him.