शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘जर्मन अँगर’च्या शामियान्यात ‘साहित्या’ची अनोखी मेजवानी; वॉटर प्रूपसह सुरक्षित अन् मजबुतीला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:07 IST

99th Marathi Sahitya Sammelan: तब्बल ५० हजार स्क्वेअर फूट मंडप 

दत्ता यादवसातारा : साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट म्हणजे संपूर्ण मंडप ‘जर्मन अँगर’ तंत्रज्ञानाच्या साह्याने उभारण्यात आला आहे. हा भव्य दिव्य मंडप एखाद्या शामियानापेक्षा कमी नसून, राज्यभरातील साहित्यप्रेमींना ग्रंथ, साहित्य, परिसंवाद अन् सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचा आनंद या मंडपात लुटता येणार आहे.सुरक्षितता व मजबुतीला प्राधान्य देण्यात आले आहे. या सर्व सुविधांमुळे हे साहित्यसंमेलन संस्मरणीय ठरणार आहे. सातारा शहरात होणाऱ्या भव्य साहित्य संमेलनासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी व्यापक तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. तब्बल ५० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या भव्य मंडपात पुस्तक स्टॉल उभारण्यात आले असून, यामध्ये एकूण २५४ प्रकाशकांचे स्टॉल सहभागी झाले आहेत. वाचकांसाठी हे मंडप साहित्य पर्वणी ठरणार आहे.

वाचा : साताऱ्यात उद्यापासून ९९ वे मराठी साहित्य संमेलन; चार दिवस साहित्यिक, पुस्तकप्रेमींत उत्साहयाशिवाय मुख्य कार्यक्रमांसाठी स्वतंत्र ५० हजार स्क्वेअर फुटाचा मुख्य पेंडॉल उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी उद्घाटन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह फोक डान्स कार्यक्रम सादर होणार आहेत. मुख्य पेंडॉलमध्ये ४ हजार आसनांची व्यवस्था करण्यात आली असून, चटईसह सभोवतालच्या परिसरात आणखी ६ हजार नागरिक बसू शकतील, अशी विशेष सोय करण्यात आली आहे.

वाचा : ‘साहित्या’च्या मेळ्यात साताऱ्याच्या इतिहासाची अनुभूती!; संगम माहुली, अजिंक्यतारा, कास पठार चित्ररूपात अवतरणारसाहित्यिक उपक्रमांना चालना देण्यासाठी गझल कट्टा, कवी कट्टा, प्रकाशन कट्टा, बाल वाचन कट्टा आणि परिसंवाद कट्टा यांसाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आले आहेत. त्यामुळे विविध वयोगटांतील रसिकांना आपापल्या आवडीचे कार्यक्रम अनुभवता येणार आहेत. व्हीआयपी पाहुण्यांच्या भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, एकावेळी ४०० व्यक्तींच्या जेवणाची सोय आहे. तसेच पोलिस परेड ग्राउंड येथे १०० फूड स्टॉल्स उभारण्यात आले असून, कार्यकर्ते व कर्मचारी यांच्यासाठी किमान १५०० जणांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलन स्थळाच्या मागील बाजूस असलेल्या स्मारक परिसरात चारचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.काय आहे ‘जर्मन अँगर’जर्मन अँगर हे तंत्रज्ञान अतिशय उत्कृष्ट आहे. जमिनीमध्ये कोणतेही खड्डे न काढता हा भव्य दिव्य मंडप उभा राहतो. केवळ जमिनीत मोठे खिळे मारले जातात. मंडपाचा ढाचा हा संपूर्ण नटबोल्टमध्ये जोडला जातो. वाॅटरप्रूप आणि सुरक्षेला प्राध्यान्य दिले गेले आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत दोनवेळा या मंडपाची उभारणी झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara's Literary Feast: German Hangar Hosts Grand Gathering, Prioritizing Safety.

Web Summary : Satara's literary festival boasts a massive, waterproof German hangar, prioritizing safety. The venue features book stalls, a main stage for cultural events, and separate areas for poetry, discussions and children. VIP dining and ample parking are available.