शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील कोलवडी डोंगर परिसरात बिबट्याच्या जोडीचा वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:41 IST

भर रस्त्यावर दोन बिबटे ठाण मांडून असल्याचे दिसले

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील पळशी वनक्षेत्रामध्ये कोलवडी हद्दीत डोंगरामध्ये दोन बिबट्यांचा वावर असल्याचे रविवारी निदर्शनास आले. पवनचक्क्यांसाठी बनवलेल्या रस्त्यावर दोन बिबटे उन्हात बसल्याचे वाहनचालकाने पाहिले. वन विभागाच्या पथकाने खातरजमा केली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी केले आहे.खेड-बर्गेवाडी फाट्यापासून डोंगरमाथ्यावर पवनचक्की बसवणाऱ्या कंपन्यांनी घाटरस्ता तयार केला आहे. तो कोलवडी गावच्या हद्दीत डोंगरमाथ्यापर्यंत जातो. या रस्त्यावर रविवारी वाहनचालकाला भर रस्त्यावर दोन बिबटे ठाण मांडून असल्याचे दिसले. त्याने वाहन थांबवत, सहकाऱ्यांसह बिबट्यांचे छायाचित्रण केले. काही छायाचित्रे त्याने व्हाॅट्सॲपद्वारे परिसरात ग्रामस्थांना पाठविली. तसेच त्वरित वन विभागाला माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी वनपाल तानाजी मोहिते, एस. एस. निकम व वनरक्षक व्ही. बी. नरळे यांचे पथक तयार करून तत्काळ घटनास्थळी पाठविले. पथकाने बिबट्यांच्या पावलांचे ठसे पाहिले.वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी सांगितले की, पळशी वनक्षेत्रात कोलवडी गावच्या हद्दीत बिबट्यांचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामस्थांनी भयभीत न होता खबरदारी घ्यावी. बिबट्या हा रात्रीच्या वेळी सक्रिय असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकटे शेतात जाणे टाळावे. पाळीव प्राण्यांना सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी ठेवावे, दरवाजे व्यवस्थित लावून घ्यावेत, रात्री घराबाहेर पुरेसा उजेड ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग