शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Updated: September 16, 2024 22:35 IST

बहीणीचे वय १६, तर भावाचे २९; भुईंज पोलीस ठाण्यात मावस भावावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: वाई तालुक्यातील एका गावात बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. मावस भावाच्या अत्याचारातून बहीण प्रसूत झाली. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात संबंधित मावस भावावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही नात्याने मावस बहीण-भाऊ, तिचे वय १६ तर त्याचे वय २९. बहीण अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही भावाने तिच्यावर त्याच्या व तिच्या घरात कोणी नसताना वारंवार अत्याचार केला. हा प्रकार मे २०२३ ते २०२४ या कालावधीत घडला. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर काही महिन्यांनंतर मुलीची प्रसूतीही झाली. तिने मुलाला जन्म दिला. या प्रकारानंतर पीडित मुलीने १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने भुईंज पोलिसांनी संबंधित मावस भावाला तातडीने अटक केली. पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, दोघेही नात्याने मावस बहीण-भाऊ असल्यामुळे भावाच्या कृत्याचा घरातल्यांना अंदाज आला नाही. जेव्हा मुलगी गरोदर राहिली तेव्हाच दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा गजब झाला. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे पोलिसांसह समाजमनही सुन्न झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsexual harassmentलैंगिक छळpregnant womanगर्भवती महिला