शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली, साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पार पडली बैठक 

By दीपक देशमुख | Updated: December 9, 2023 18:00 IST

श्रमिकचे भारत पाटणकरांचीही उपस्थिती

सातारा : राज्यात महायुती आघाडीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून आगामी रणनिती ठरवण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासह श्रमिक मुक्ती दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथे पार पडली. बैठकीत राज्यासह देशातील हुकूमशाही पद्धतीच्या सरकारविरोधात व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाव आणि जिल्हापातळीवर बूथ रचना मजबूत करणे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, जनसंपर्क वाढवणे यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सचिव नरेंद्र देसाई, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सचिन मोहिते, प्रभाकर देशमुख, दीपक पवार, पारिजात दळवी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील इत्यादी उपस्थित होते.यानंतर माध्यमांशी बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या महायुती सरकारकडून जनतेची कोट्यावधी रुपयाची निधी जाहीर करून प्रत्यक्षात मात्र फसवणूक केली जात आहे. सरकारच्या या दडपशाही विरोधात जनआंदाेलन उभारण्यात येईल. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार गावपातळीवर व्यापक जनाधार निर्माण करणे कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, त्यांचे संघटन निर्माण करणे, तालुका न्याय कार्यकर्त्यांचे मिळावे भरवणे, मिळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना राजकीय दृष्ट्या प्रशिक्षित करणे इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. 

पुनर्वसन, सिचंनाच्या प्रश्नासाठीच राजकीय व्यासपीठावर : पाटणकरधरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले, पुनर्वसन आणि सिंचनाचे प्रश्न महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे आहेत. धरणग्रस्तांनी गेल्या वर्षभरात मोठ-मोठी जन आंदोलने केली. मात्र, राज्यातले सरकार आंदोलनकर्त्यांची हाक ऐकायला तयार नाही.  अशा हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात एकत्र येऊन एक व्यापक जनचळवळ उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. या माध्यमातून शोषितांचे आणि वंचितांचे प्रश्न सुटणार असतील तर चळवळीचा भाग बनून शोषितांना न्याय देण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस