शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिला, एकास दांड्याने हाणला; साताऱ्यातील घटना

By नितीन काळेल | Updated: December 15, 2023 18:34 IST

सातारा : राजापूरी, ता. सातारा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिला म्हणून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. ...

सातारा : राजापूरी, ता. सातारा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिला म्हणून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये संबंधित जखमी झाले आहेत. याप्रकरणी एकावर तालुका पोलिस ठाण्यात दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी बाबाजी राजाराम मोरे (रा. राजापुरी) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार तानाजी गोविंद साळुंखे उर्फ भावड्या (रा. राजापुरी) याच्याविरोधात गुन्हा नोंद आहे. दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास राजापुरी येथेच मारहाणीची ही घटना घडली.ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिल्याच्या कारणातून संशयित हा तक्रारदार बाबाजी मोरे यांच्या समोरुन वाहन जोरात घेऊन गेला. त्यानंतर शिवीगाळ करत तुला मस्ती आली आहे असे म्हणत गाडीतून उतरुन हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी मोरे यांनी दांडके अडविण्यासाठी हात केला. मात्र, मारहाणीत त्यांच्या दोन्ही हाताला मुक्का मार बसला. तसेच यावेळी मोरे यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत.याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सहायक फाैजदार वायदंडे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारी