शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज देतो म्हणून कोल्हापुरातील एकाची १३ लाखांची फसवणूक, साताऱ्यातील एकावर गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:59 IST

सातारा : बांबू प्रोसेसिंग युनिट स्थापण्यासाठी परदेशातून कर्ज प्रकरण करून देतो असे म्हणून एकाची सुमारे १३ लाख रुपयांची फसवणूक ...

सातारा : बांबू प्रोसेसिंग युनिट स्थापण्यासाठी परदेशातून कर्ज प्रकरण करून देतो असे म्हणून एकाची सुमारे १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात साताऱ्यातील एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याप्रकरणी कुशल साताप्पा कुकडे (रा. आपटेनगर कोल्हापूर) यांनी तक्रार दिली. त्यानुसार दिलीप अरविंद प्रभुणे (रा. शाहूनगर, सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.तक्रारीनुसार गेल्यावर्षी ११ फेब्रुवारी ते २२ ऑक्टोबर यादरम्यान साताऱ्यात शाहूनगरमधील प्रभुणे मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी नावाच्या कार्यालयात हा प्रकार घडला. बांबू प्रोसेसिंग युनिट स्थापन करण्यासाठी संशयिताने तक्रारदारास परदेशातून कर्ज प्रकरण करून देतो असे सांगितले. तसेच विविध कागदपत्रांची मागणी केली. कर्ज प्रकरणासाठी लागणारी कागदपत्रे तयार करून तक्रारदार कुशल कुकडे यांच्या सह्या घेत त्यांना एक प्रत देत विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी कारणे सांगून कर्ज मंजुरीसाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले. अशाप्रकारे १२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीbankबँक