शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिकाऱ्यांच्या फासकीत अडकून बिबट्याचा तुटला पंजा, फास लावणाऱ्याच्या वनविभागाने आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:59 IST

ती विशिष्ट फास आली कोठून यासह वनाधिकारी कसून चौकशी करत आहेत

मलकापूर : खोडशी (ता. कऱ्हाड) येथे लावलेल्या फासामध्ये बिबट्या अडकल्याची घटना काल, मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी वन विभागाने तपासाची चक्रे फिरवत काल रात्री उशिराच फास लावणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. खोडशी येथील एकाला ताब्यात घेतले असून, ती विशिष्ट फास आली कोठून यासह वनाधिकारी कसून चौकशी करत आहेत.बाबू सखाराम जाधव (वय ४५, सध्या रा. खोडशी, कायम राहणार गोपाळनगर कार्वे) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. 

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल, मंगळवारी सकाळी खोडशी गावाच्या हद्दीत सावकार मळा परिसरात बिबट्या लोखंडी फासामध्ये अडकल्याची माहिती खोडशी गावाचे पोलीस पाटील यांनी दूरध्वनीवरून वनविभागाला दिली. त्यानंतर कऱ्हाडमधील वनक्षेत्रपाल तुषार नवले आपल्या पथकासह सावकार मळा, खोडशी या ठिकाणी पोहोचले. 

यावेळी या फासात ९ ते १० महिने वयाचा बिबट्या पाय अडकून जखमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर बिबट्याला वराडे रोपवाटिकामध्ये हलविण्यात आले. रोपवाटिकेमध्ये या बिबट्याच्या पायात अडकलेली फास काढण्यात आली. या ठिकाणी डॉ. चंदन सावणे यांनी बिबट्यावर औषध उपचार केले.या घटनेचे गांभीर्य ओळखून वन कर्मचाऱ्यांनी खोडशी गावच्या परिसरात या गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली. यावेळी आरोपीचा माग काढण्यासाठी वन्यजीव विभाग कऱ्हाड यांचे डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले होते. संशयिताला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्या