सचिन काकडेसातारा : देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड आता कात टाकू लागला आहे. ‘प्रतापगड विकास प्राधिकरणा’च्या माध्यमातून किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच, गडाच्या इतिहासातील एक विस्मृतीत गेलेले पान पुन्हा उलगडले आहे. नुकतीच गडावरील पालखी बुरुजाजवळची ऐतिहासिक ‘चोरवाट’ मातीच्या ढिगाऱ्यातून मोकळी करण्यात आल्याने शिवकालीन दुर्गशास्त्राचे वैभव जगासमोर आले आहे.
प्रतापगड विकास प्राधिकरणाकडून किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम शास्त्रोक्त पद्धतीने केले जात आहे. आतापर्यंत झेंडा बुरुज ते पालखी बुरुज दरम्यानची तटबंदी, यशवंत बुरुज आणि रेडका बुरुज यांचे संवर्धन पूर्ण झाले आहे. तटबंदीच्या भिंतींमधील दर्जे (सांधे) भरण्याचे काम पूर्ण झाले असून, पुढील टप्प्यात ऐतिहासिक पायरी मार्ग आणि तळ्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.
प्रतापगड विकास प्राधिकरणाकडून किल्ल्याच्या संवर्धनाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत बुरुज आणि तटबंदीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित टप्पेही गतीने पूर्ण केले जातील. गडावर आढळलेली चोरवाट मातीमुळे बंद झाली होती, ती आता पूर्णपणे मोकळी करण्यात आली आहे. - विलास वहाने, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग
अशी उलगडली ‘ती’ ऐतिहासिक चोरवाटपालखी बुरुजाजवळ एक मार्ग असावा, अशी कल्पना स्थानिक रहिवाशांना होती; मात्र पाऊस, साचलेली माती आणि वाढलेल्या झाडाझुडपांमुळे ही वाट पूर्णपणे बंदिस्त झाली होती. पुरातत्त्व विभागाने या ठिकाणची माती अत्यंत सावधगिरीने बाहेर काढल्यानंतर, एक सुस्थितीत असलेला मार्ग दृष्टिक्षेपात आला.मुख्य दरवाजावर शत्रूने हल्ला केल्यास याच चोरवाटेने बाहेर पडून शत्रूच्या पाठीमागून हल्ला चढवावा किंवा आणीबाणीच्या वेळी गडाबाहेर पडावे, या रणनीतीसाठी ही वाट निर्माण केल्याचे दुर्गप्रेमींनी सांगितले.
Web Summary : Restoration work at Pratapgad Fort has unearthed a historical secret passage near Palkhi Bastion. This discovery reveals the strategic brilliance of Maratha military architecture. The passage, once hidden by debris, likely served as an escape route or a way to outflank enemies.
Web Summary : प्रतापगढ़ किले में जीर्णोद्धार कार्य के दौरान पालकी बुर्ज के पास एक ऐतिहासिक गुप्त मार्ग का पता चला। यह खोज मराठा सैन्य वास्तुकला की रणनीतिक प्रतिभा को दर्शाती है। यह मार्ग, जो कभी मलबे से छिपा हुआ था, संभवतः भागने के रास्ते या दुश्मनों को मात देने के तरीके के रूप में काम करता था।