शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात शिवजयंती सोहळा थाटात, शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By सचिन काकडे | Updated: February 19, 2024 18:16 IST

शंभर फुटी भगव्या ध्वजाचेही अनावरण

सातारा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शाहूनगरीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. पोवई नाक्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नक्षत्रच्या संस्थापक अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते पाच नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला. यानंतर पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हजारो शिवभक्तांनी हा देदीप्यमान सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.ब्रह्मवृंद्धांच्या मंत्रपठणानंतर सोमवारी सकाळी जलाभिषेक विधीला सुरुवात झाली. दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते पाच नद्यांच्या पाण्यांनी विधिवत पद्धतीने छत्रपतींच्या पुतळ्याला  जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवज्योतीचे पूजन करून छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवभक्तांच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या शंभर फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. या अनावरणानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी..जय शिवाजी' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.सकाळी सव्वानऊ वाजता शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी गगनभेदी घोषणा देत युगपुरुषाला अभिवादन केले. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची सकाळपासूनच पोवई नाक्यावर रेलचेल सुरू होती. यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी नगरसेवक निशांत पाटील, वसंत लेवे, प्रशांत आहेरराव, माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, सुनील काटकर, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंती