शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कऱ्हाडात बनावट सोन्याची बिस्किटे देऊन ५० लाखांच्या फसवणुकीचा डाव उधळला, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:58 IST

सोनाराची सतर्कता अन् कऱ्हाड पोलिसांची कारवाई

कऱ्हाड : कऱ्हाड येथे सोन्याची बनावट बिस्किटे देऊन त्या बदल्यात पैसे हडपण्याचा प्रकार सोनाराने दाखवलेली सतर्कता व पोलिसांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे उघड झाला. त्यामुळे पोलिसांना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. हे तिघे बनावट सोन्याची बिस्किटे विक्रीस आणून तब्बल ५० लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत होते.गोविंद एकनाथराव पदातुरे (रा. अहमदपूर, जि. लातूर), सर्जेराव आनंदा कदम (रा. पिसाद्री, कोल्हापूर) व अधिक आकाराम गुरव (रा. म्हासुर्णे, खटाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुजावर कॉलनीतील आसिफ अकबर मुल्ला यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळवारी रात्री ७:३० च्या सुमारास एकजण दुकानात दाखल झाला. त्या व्यक्तीने त्याचे नाव गोविंद पदातुरे असल्याचे सांगून, माझ्याकडे चोवीस कॅरेटचे ५०० ग्रॅम शुद्ध सोने असून, ते मला विकायचे आहे, असे सांगितले. गोविंद पदातुरे याने त्याच्याकडे असलेल्या बिस्किटांपैकी एक बिस्कीट पांढऱ्या प्लास्टिक पिशवीतून काढून आसिफ मुल्ला यांना दाखवले.

हे बिस्कीट पाहताक्षणीच खरे वाटल्याने मुल्ला यांना संशय आला. त्याच वेळी गोविंद याने आपल्या मित्राच्या घरी गजानन हौसिंग सोसायटी येथे व्यवहार करू, असे सुचवले. असिफ मुल्ला यांना संशय आल्यामुळे त्यांनी गोविंद याची नजर चुकवून कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यास याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने याची दखल घेत उपनिरीक्षक सांडगे यांना कारवाईसाठी पाठवले.असिफ मुल्ला हे गोविंदसोबत दुचाकीवरून गजानन हौसिंग सोसायटी येथे गेले. त्या ठिकाणी सर्जेराव कदम व अधिक गुरव हे दोघे उपस्थित होते. तिघांनी मिळून बनावट सोन्याच्या १० बिस्किटांचा व्यवहार सुमारे ५० लाखांना रोख रकमेत करण्याची बोलणी सुरू केली.याचवेळी पोलिस निरीक्षक नीलेश तारू, उपनिरीक्षक निखिल मगदुम व सहकाऱ्यांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. तिघांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या खिशात बनावट सोन्याची ११ बिस्किटे सापडली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.