शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा भरून पुण्याला निघालेला कंटेनर पकडला, तब्बल ४७ लाखांचा गुटखा जप्त

By दत्ता यादव | Updated: October 3, 2023 12:02 IST

सातारा: कर्नाटकातून गुटखा भरून पुण्याकडे निघालेला कंटेनर शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडला. या कंटेनरमध्ये तब्बल ४७ लाखांचा गुटखा आढळून ...

सातारा: कर्नाटकातून गुटखा भरून पुण्याकडे निघालेला कंटेनर शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडला. या कंटेनरमध्ये तब्बल ४७ लाखांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून, ही कारवाई सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास करण्यात आली.गुफाराम शमीम खान (वय ३६, रा. आयशा बिल्डिंग, भाेलेनाथ नगर, मुंब्रा ठाणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकातून गुटखा भरून कंटेनर पुण्याकडे जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शेंद्रे, ता. सातारा येथील ‘राजस्थानी हायवे’ या नावाच्या हाॅटेलजवळ सापळा लावला. दुपारी साडेचार वाजता कंटेनर शेंद्रे येथे येताच पोलिसांच्या पथकाने कंटेनर अडवला. पोलिसांनी चालकाकडे विचारपूस केली असता त्याने कंटेनरमध्ये विविध कंपनीचा गुटखा असल्याचे सांगितले. अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर, इम्रान हवालदार यांना पोलिसांनी बोलावून घेतल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी आले. त्यांच्या समक्ष पंचनामा झाल्यानंतर कंटेनरमधील गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला. तब्बल ४७ लाखांचा गुटखा  सापडल्याने अजूनही मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. या कारवाईमध्ये  सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमीत पाअील ,मदन फाळके, अतीश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, अमीत सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, ओंकार यादव आदींनी भाग घेतला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पॅकिंग न ओळखून येण्यासारखे..संपूर्ण कंटेनर गुटख्याने तुडूंब भरलेला होता. पोत्यात आणि बाॅक्समध्ये गुटखा पॅक करून पद्धशीरपणे ठेवला होता. जणूकाही वेगळा कोणता तरी माल यात आहे, असे भासविले होते. परंतु पोलिसांच्या अचूक माहितीमुळे गुटख्याची तस्करी उघडकीस आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी