शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीरपणे मांडूळ बाळगल्या प्रकरणी वडी येथील एकावर गुन्हा दाखल, वनविभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:17 IST

वनविभागाच्या कारवाईमुळे औंध परिसरात एकच खळबळ उडाली  

औंध : बेकायदेशीरपणे मांडूळ बाळगल्याप्रकरणी वनविभागाने वडी ता. खटाव येथील एकावर गुन्हा दाखल केला आहे. तर त्याच्याजवळील जिवंत मांडुळ ताब्यात घेतले आहे. ते मांडूळ अंदाजे अडीच ते तीन किलो वजनाचे आहे. नवनाथ भागवत येवले (वय ४२) असे या ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडी येथील नवनाथ येवले याने जिवंत मांडूळ पकडल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा वनसंरक्षक अधिकारी आर. ए. व्होरकाटे व औंधचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व पोलीस पथकाने संयुक्तपणे वडी येथे छापा मारून येवले यांच्यासह जिवंत मांडूळ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे औंध परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी मिळाली आहे. वन विभाग व पोलीस पथकाच्या धडक कारवाईमुळे वन्यप्राणी बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमध्ये वनपाल रामदास घावटे, बी. एस. जावीर, बी. एन. जाधव, सी. बी. पाटील, डी. एन. व्हनमाने, एस. एम. तांबोळी, एस. आर. दहिफळे, एम. एन. मोहिते, सर्पमित्र प्रसाद गुरव यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर